आधी बॉम्ब नंतर सुतळी बॉम्ब : प्रकरण शेकण्याच्या धाकाने घुमजावलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मुख्यमंत्र्यांच्या घरावर बॉम्ब टाकण्याची भाषा वापरणाऱ्या आणि नंतर बॉम्ब नव्हे, सुतळी बॉम्ब, असे घुमजाव करणाऱ्या पळपुट्या, कमजोर आणि षंढ आमदार बच्चू कडूचा आम्ही निषेध करतो. गावागावांत बच्चू कडू विरोधात पोलिसांत तक्रारी नोंदवा, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांनी शुक्रवारी येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आ.बच्चू कडूंच्या विरोधात भाजपजन एकत्र आले होते.यावेळी आ.सुनील देशमुख, शहराध्यक्ष जयंत डेहनकर, निवेदिता चौधरी, गजानन कोल्हे, जयंत आमले देखील उपस्थित होते. बच्चू कडूंच्या गावात पाण्याची सोय नाही आणि राज्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी हा आमदार सरसावला आहे.‘सायलेंट झोन’मध्ये भाषणबाजीजिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आंदोलकांनी ध्वनीक्षेपकांद्वारे भाषण दिले. माहितीनुसार, त्यापरिसरात ध्वनीक्षेपकांचा वापर वर्ज्य आहे. आंदोलकांनी नियम मोडला असेल तर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल का, अशी चर्चा परिसरात सुरू होती. बच्चू कडूंना दहशतवादी घोषित करानेहमी सनसनाटी वक्तव्य करून सामाजिक सौदार्ह बिघडविणाऱ्या आ.बच्चू कडू यांना दहशतवादी घोषित करा, अशी मागणी भाजपने जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या घरात त्यांची आई, पत्नी, मुलगी व कर्मचारी राहतात. बच्चू कडूंना हा बॉम्ब त्यांच्यावर का टाकावासा वाटतो, असा सवाल निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे. कडूंच्या घराची झडती घ्यामुख्यमंत्र्यांच्या घरावर बॉम्ब टाकण्याचे वक्तव्य करणाऱ्या आ. बच्चू कडू यांच्या घराची बारकाईने झडती घ्यावी. त्यांचे नक्षलवादी, दहशतवाद्यांशी काही संबंध आहेत का, याचीही सखोल चौकशी करावी व तत्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, शिवराय कुलकर्णी व अन्य पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
भाजप म्हणाले, बच्चू कडू पळपुटे
By admin | Updated: June 10, 2017 00:03 IST