अमरावती : स्थानिक रेल्वे स्टेशन चौक ते गजानन महाराज मंदिरापर्यंतच्या नाली बांधकामावरुन माजी पालकमंत्री सुनील देशमुख यांच्या जनसंपर्क कार्यालयापुढे आणि त्यांच्या समक्ष महापालिकेतील भाजप गटनेत्याला धक्काबुक्की करण्यात आली. शनिवारी दुपारी ही घटना घडली.तू-तू, मै- मै सुरु असताना माजी महापौरांनीही या वादात उडी घेतली. यावेळी सुनील देशमुखांनी मध्यस्थी करुन या वादावर पडदा टाकला. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या वादाची चर्चा शनिवारी रंगली. भाजपचे गटनेते संजय अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाच्या नगरोत्थान अनुदानातून रेल्वे स्टेशन चौक ते गजानन महाराज मंदिरापर्यंत नालीचे बांधकाम सुरु आहे. सांडपाण्याचा व्यवस्थित निचरा व्हावा, यासाठी काही ठिकाणी या नालीवर रपटे बांधण्यात आले. मात्र, देशमुख यांच्या जनसंपर्क कार्यासमोर नालीवर टाकलेल्या रपट्यामुळे पावसाचे पाणी साचत असल्याने काही दिवसांपासून सुनील देशमुखांच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती.
माजी पालकमंत्र्यांच्या समक्ष भाजप गटनेत्यांना धक्काबुक्की
By admin | Updated: September 20, 2014 23:41 IST