शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

मृतावस्थेत बिबट आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 22:37 IST

चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत चिरोडी जंगलात एक चार वर्षीय नर बिबट रविवारी सायंकाळी ५ वाजता मृतावस्थेत आढळला.

ठळक मुद्देउशिरा पंचनामा : चिरोडी जंगलात नैसर्गिक मृत्यूचा अंदाज

अमोल कोहळे।लोकमत न्यूज नेटवर्कपोहरा : चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत चिरोडी जंगलात एक चार वर्षीय नर बिबट रविवारी सायंकाळी ५ वाजता मृतावस्थेत आढळला. या घटनेमुळे वनविभागात एकच खळबळ उडाली असून बिबट्याचा नैसर्गिक मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वनाधिकाºयांनी वर्तविला आहे. उशिरा रात्रीपर्यंत मृत बिबट्याचा पंचनामा सरूच होता.चिरोडी जंगलात येणाºया पश्चिम चिरोडी वनबीट वनखंड क्रमांक ४० मध्ये वनकर्मचारी गस्तीवर असताना त्यांना सुमारे पाच वर्षीय बिबट मृतावस्थेत आढळून आले. ही माहिती वन कर्मचाºयांनी चांदूररेल्वेचे वनपरिक्षेत्राधिकारी आशिष कोकाटे यांना दिली. त्यानंतर घटनास्थळी सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर दाखल झाले. बिबट्याच्या अंगावर कोणत्याही प्रकारच्या जखमा, मार नसल्याने त्याचा मृत्यू कशामुळे झाला असावा, याबाबत वनाधिकारीदेखील अंदाज वर्तवू शकले नाहीत. त्यामुळे एसीएफ कविटकर यांनी पशू वैद्यकीय अधिकाºयांसोबत संपर्क साधून मृतावस्थेत आढळलेल्या बिबट्याचे विच्छेदन करण्याबाबतचे कळविले. मात्र, पशू वैद्यकीय अधिकारी उपलब्ध झाले नसल्याने सोमवारी ३० आॅक्टोबर रोजी बिबट्याचे विच्छेदन होणार आहे. त्यामुळे बिबट कशामुळे दगावला, हे सोमवारी समजू शकेल, असे कविटकर यांनी सांगितले. दरम्यान पोहºयाचे वनपाल विनोद कोहळे, चिरोडीचे वनपाल सुधाकर निर्मळ यांनी घटनास्थळ गाठून बिबट्याचा मृत्यू घातपाताने तर झाला नसावा? याबाबत बिबट्याचे शरीर तपासून शंका उपस्थित केल्यात. मात्र, मृत बिबट्याच्या शरीरावर कोणत्याही जखमा नसल्याने त्याचा मृत्यू नैसर्गिक झाला असावा, असे गृहीत धरले. त्यानंतर सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर यांच्या मार्गदर्शनात घटनास्थळी मृत बिबट्याचा पंचनामा करण्यात आला. यावेळी वनरक्षक सुनील येरवाड, एस.एम. कथलकर, सतिश नाईक, राजेश खडसे, प्रभाकर शेंडे, शेख रफिक, शालिक पवार, चव्हाण, मंगल यादव उपस्थित होते. बिबट्यावर सोमवारी चिरोडी जंगलात घटनास्थळीच विच्छेदन केले जाणार आहे.घटनास्थळी आढळले सायाळचे काटेचिरोडी जंगलात नाल्याच्या कपारीत मृतावस्थेत आढळलेल्या बिबट्याच्या शेजारी सायाळचे काटेदेखील आढळले आहेत. तसेच बिबट्याच्या तोंडावर दर्शनी भागात नाकाशेजारी खरचटल्याचे दिसून आले. त्यामुळे सायाळचे काटे बिबट्याला रुतले असावे, असा अंदाज बांधला जात आहे.