शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात १३०० ग्रॅम वजनाच्या अर्भकाचा सुखरूप जन्म

By admin | Updated: February 16, 2017 00:10 IST

मोथा उपकेंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या आलाडोह गावातील ग्रामस्थ कालुजी येवले यांची मुलगी अनिता कृष्ण हेगडे (रा. देवगाव) या गावावरून ...

मोथा उपकेंद्राची कामगिरी : वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रयत्न फळाला, महिलेची सुखरूप प्रसूती परतवाडा : मोथा उपकेंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या आलाडोह गावातील ग्रामस्थ कालुजी येवले यांची मुलगी अनिता कृष्ण हेगडे (रा. देवगाव) या गावावरून आपल्या आई-वडिलांकडे प्रसुतीसाठी आॅक्टोंबर महिन्यात आली होती. तेव्हापासून ही गर्भवती महिला आलाडोह येथे राहत होती. उपकेंद्र मोथा अंतर्गत या गर्भवती महिलेची झिरो नंबरवर नोंद करुन त्या महिलेला आरोग्यसेवा पुरविण्यात आल्या. अशातच २३ डिसेंबर २०१६ रोजी चिखलदरा येथील ग्रामीण रुग्णालयात तिची प्रसुती झाली. मात्र या महिलेने १ किलो ३०० ग्रॅम वजनाच्या एका गोंडस बाळाला जन्म दिला. कमी वजन असल्याने व आईचे दूध ओढू शकत नसल्यामुळे आरोग्य विभागासमोर त्या बालकाला वाचविण्याची धडपड सुरू झाली. ग्रामीण रुग्णालयातून पुढील उपचारासाठी त्या बालकाला अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तेथूनही अमरावतीला रेफर केले. त्यामुळे त्या बाळाला अमरावतीला घेवून जाण्यास घरचे तयार नव्हते म्हणून घरच्यांनी व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परतवाडा येथील खासगी बालरोग तज्ज्ञ रावत यांच्याकडे उपचारासाठी नेले. आईचे दूध ओढू शकत नसल्याने बालक दगावण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र डॉक्टरांनी त्या बालकाला नळीद्वारे दूध देण्यास सुरुवात केली. तीन दिवस खासगी रुग्णालयात ठेवल्यानंतर त्या बालकाला नळी लावल्याच्या अवस्थेत घरी नेण्यात आले.त्यानंतर आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्या बालकावर विशेष लक्ष ठेवत वेळोवेळी औषधोपचार करून व आईला मार्गदर्शन केले. आज रोजी त्या बालकाची व मातेची प्रकृती व्यवस्थित असून ते बालक आज दीड महिन्याच्यावर झाले असून त्याचे वजन तीन किलो झाले आहे. गुंतागुंतीची प्रसुती व कमी वजनाचे बालक या दोघा मायलेकांना वाचविण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी भालेराव, मेळघाटचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी रनमले, प्राथमिक आरोग्य केंद्र सलोनाचे वैद्यकिय अधिकारी कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोथा उपकेंद्राच्या वैद्यकिय अधिकारी नीता नागले, सुपरवायझर औतकर, आरोग्यसेवक साळुंखे, आरोग्य सेविका प्रविणा धाकडे, आशा सुपरवायझर शेवंता खडके, अंगणवाडी सेविका सुमित्रा आकोटकर, आशा वर्कर आदींच्या प्रयत्नामुळे त्या बालकाला जिवनदान मिळाले आहे. (तालुका प्रतिनिधी)