शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
2
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
3
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
4
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
5
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
6
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
7
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
8
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
9
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
10
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
11
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
12
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
13
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
14
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
15
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
16
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
17
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
18
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
19
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
20
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...

बाजार समिती निवडणुकीत कोट्यवधींची उलाढाल

By admin | Updated: August 30, 2015 00:15 IST

अचलपूर बाजार समितीची निवडणूक नुकतीच आटोपली. निवडणुकीत पैशांची उधळपट्टी झाली. काही उमेदवारांनी एक कोटीपेक्षा जास्त खर्च केल्याची माहिती आहे.

सुनील देशपांडे अचलपूरअचलपूर बाजार समितीची निवडणूक नुकतीच आटोपली. निवडणुकीत पैशांची उधळपट्टी झाली. काही उमेदवारांनी एक कोटीपेक्षा जास्त खर्च केल्याची माहिती आहे. या निवडणुकीला आचारसंहितेचे बंधन नसल्याने खर्चाचा हिशोब विचारणारे कोणी नसल्याने धनदांडग्या उमेदवारांना ही निवडणूक चांगलीच सोईची झाली होती.जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाची ही बाजार समिती आहे. बाजार समिती ज्याच्या ताब्यात राहील, त्याची ग्रामीण भागातील राजकारणावर पकड असते. निवडणुकीच्या रिंगणात एकूण ४२ उमेदवार होते. ३६ उमेदवार वेगवेगळ्या गटाचे तर ६ अपक्ष होते. एका गटाचे नेतृत्व आमदार बच्चू कडू तर दुसऱ्याचे बबलू देशमुख करत होते. समितीच्या राजकारणात ही दोन दिग्गजांची राजकीय लाढाई मानली जात होती. आपले वर्चस्व बाजार समितीवर रहावे यासाठी दोन दिग्गजांनी राजकीय शक्ती पणाला लावली होती. निवडणूक लढवत असलेले बहुतांशी उमेदवार आर्थिकदृष्ट्या भरभक्कम होते. त्यांचा आपआपल्या भागातील राजकारणात दबदबा होता. त्यामुळे या निवडणुकीत पैशाची गंगा वाहिल्याची चर्चा जनतेत आहे.खरे म्हणजे या निवडणुकीची एक वेगळीच पद्धत दिसत होती. आचारसंहिता व खर्चाचे बंधन बाजार समितिच्या निवडणुकीला लागू होत नाही. त्यामुळे धनदांडग्या व्यक्तींना ही निवडणूक खूपच सोईची असते. सहकारी संस्थांच्या निवडणुका सहकारी कायद्यानुसार होतात. सहकार आयुक्तांच्या निर्देशानुसार निवडणुका घेणे सहकारी संस्थांना बंधनकारक आहे. त्यास निवडणूक आयोगाचे बंधन असते. परंतु बाजार समित्या या समिती कायद्याखाली पंचीबध्द असल्याने या निवडणुकांना निवडणूक आयोगाची आचारसंहिता लागू होत नाही. त्यामुळे खर्चाचे विवरण देणे उमेदवाराला बंधनकारक नव्हते. असे नियम व वातावरण असल्याने साधारण वातावरणात निवडणुका होणे शक्य नसल्याचे सूर्यप्रकाशाएवढे सत्य होते. विशेष म्हणजे सहकारी संस्थापेक्षा बाजार समित्यांचा लेखाजोखा मोठा असतो. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणूका नेत्यांना जास्त आकर्षित करत असतात. त्यामुळे साहजिकच या निवडणूका साधारण वातावरणात पार पडत नाही.निवडणऊकी आचार संहिता व खर्चाचे बंधन नसल्याने निवडणूक रिंगणातील काही उमेदवारांनी पदांचा व पैशाचा पुरेपूर वापर केला. त्यावर आपल्या यशापयशाचे गणित आखले होते. यात कुणाचा पैसा किती खर्च झाला कुणी पैशाचा किती पाऊस पाडला हे ज्या त्या उमेदवारालाच माहिती आहे. एका गटाच्या उमेदवाराने तर वाटप करण्यासाठी आपल्या विश्वासातील खास प्रामाणीक व्यक्तीची निवड केली होती. पण पैसा भल्याभल्यांची नीती भ्रष्ट करते, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. निवडणुकीत एकूण २४७३ मतदार होेते. ९५.२५ टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रियादेखील शांततेत पार पडली. यावरून समितीचा मतदार जागृत असल्याचे दिसून आले. त्याला लोकशाहीत आपल्या मताची किमत चांगलीच ठाऊक आहे. काही उमेदवार मतदाराला भेटण्यासाठी जात असताना वाहनांच्या ताफ्याने जात होते. तो ताफा जात असताना हा पंतप्रधानांच्या की, मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा, असा प्रश्न लोकांना पडला होता. मागील पंधरा दिवसांत तालुक्यात पैशांचा पाऊस पडला, असा भास लोकांमध्ये निर्माण झाला होता. अमरावती कृषी उत्तपन्न बाजार समितीनंतर सर्वात मोठी बाजार समितीम्हणून अचलपूर बाजार समितीकडे पाहिले जाते. या समितीची आर्थिक उलाढालदेखील कोट्यवधींच्या घरात आहे. शेतकरी हितासाठी बाजार समितीचे प्रयत्न सुरु असले तरी लाखोंची उधळण या निवडणुकीत झाल्याचे बोलले जाते.