शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

हजेरी अहवालाविना ‘अमृत’ला ९६ लाखांचे बिल

By admin | Updated: January 1, 2017 00:43 IST

महापालिकेला सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या ‘अमृत’ संस्थेला हजेरी अहवालाविनाच ९६ लाख ७ हजार ३२६ रुपयांचे देयके अदा करण्यात आली.

अमरावती : महापालिकेला सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या ‘अमृत’ संस्थेला हजेरी अहवालाविनाच ९६ लाख ७ हजार ३२६ रुपयांचे देयके अदा करण्यात आली. या सर्व प्रकारामुळे प्रशासनातील संबंधित घटक संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. सुरक्षारक्षकांचा उपस्थिती अहवाल नसतानासुध्दा ‘अमृत’ला फेब्रुवारीत १३ ,०८,९००रुपये, मार्चमध्ये १३ लाख ६९ हजार ९८२ रुपये, एप्रिल व मे मध्ये प्रत्येकी १२ लाख ८२ हजार ७२२ रुपये, जूनमध्ये १३ लाख २६ हजार ३५२ रुपये, जुलैमध्ये १४ लाख ८३ हजार ४२० रुपये आणि आॅगस्टमध्ये १५ लाख ५३ हजार २२८ रुपये अदा करण्यात आले. अमृतने पुरविलेले सुरक्षारक्षक खरोखर विहित केलेल्या कार्यस्थळावर उपस्थित होते की कसे, याची खातरजमा करण्यात आली नाही. जीएडीची लेटलतिफी अमरावती : फेब्रुवारी २०१६ ते आॅगस्ट २०१६ या कालावधीत अमृतला सुरक्षा रक्षकांच्या मानधनापोटी प्रतिसुरक्षा रक्षक ८,७२६ रुपयांप्रमाणे मानधनाची एकूण रक्कम देण्यात आली. येथेच प्राथमिक स्वरुपात आर्थिक अनियमितता झाल्याचा अभिप्राय महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला. उपस्थिती अहवाल नसताना अमृतला देयके मंजूर करण्यात आली. यात प्रशासकीय अनियमितता झाल्याचे निरीक्षणही अधिकाऱ्यांनी नोंदविले. १५४ सुरक्षा रक्षक पुरविण्यासंदर्भात अमृत सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या संस्थेला उपायुक्त विनायक औगड यांच्या स्वाक्षरीने १९ मे २०१६ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आले. मे महिन्यातच हा करारनामा झाल्याची नोंद आहे. मात्र कार्यारंभ आदेश आणि करारनामा केल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने प्रचंड लेटलतिफी चालविली. या विभागातील एक-दोघाला हाताशी घेऊन आणि बड्या अधिकाऱ्यांचा वरदहस्त प्राप्त करून या या आर्थिक गोरखधंद्याला सुरुवात झाली. सुरक्षारक्षकाची कर्तव्यावरील हजेरी पूर्ण महिना असणे आवश्यक राहील. सुरक्षा रक्षक ज्या ठिकाणी कर्तव्यावर राहील, त्या ठिकाणी व्हिजिट बुक ठेवणे आवश्यक राहील, अमृत संस्था त्या व्हिजिट बुकवर सुरक्षा रक्षकांच्या हजेरीची नोंद घेईल व संबंधित विभागप्रमुखांकडून प्रमाणित करून घेईल, असे करारनाम्यात नमूद आहे. मात्र प्रत्यक्षात या अटींचे उल्लंघन करण्यात येऊन अमृतला या सात महिन्यांत ११०१ सुरक्षा रक्षकांचे मानधन देण्यात आले. (प्रतिनिधी)