शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान मोठे, पंचनामे खोटे

By admin | Updated: April 17, 2015 23:56 IST

जिल्ह्यावर डिसेंबर २०१४ अखेरपासून अवकाळी काळी छाया आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले.

नाचविले कागदी घोडे : सर्वच तालुक्यात १५ हजार हेक्टर बाधित क्षेत्रअमरावती : जिल्ह्यावर डिसेंबर २०१४ अखेरपासून अवकाळी काळी छाया आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले. शासनाने या बाधित क्षेत्राला विशेष बाब म्हणून मदतीचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ७ हजार ९८३ हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे. महसूल व कृषी विभागाद्वारा केवळ २८ फेब्रुवारी व १ मार्च या दिनांकांचा पंचनामा करण्यात आला. प्रत्यक्षात मार्च महिन्यात कित्येकदा अवकाळीने पिकाची हानी केली आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यात १५ हजारावर हेक्टर श्ोतीपीकाचे नुकसान झाले असताना ८ हजार हेक्टरमध्ये नुकसानीचा शासनाचा संयुक्त अहवाल खोटा असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. जिल्ह्यात रबी हंगामाकरीता १ लाख ४७ हजार ८९० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित होते. खरीपाचा हंगाम माघारल्याने रबीचा हंगाम देखील दीड महिने माघारला. कृषी विभागाच्या नियोजनापेक्षा ५ टक्के अधिक रबीची पेरणी यावर्षी झाली. यामध्ये सर्वाधिक ९८ हजार हेक्टर क्षेत्रात हरभरा व ५२ हजार हेक्टर क्षेत्रात गहू अशी पेरणी झाली. डिसेंबर २०१४ अखेरीस पासून अवकाळी पाऊस व गारपीटीचे सत्र जिल्ह्यात सुरु झाले. जानेवारी महिन्यात ३ वेळा, फेब्रुवारीत २ वेळा मार्च महिन्यात ३ वेळा व एप्रिल महिन्यात सध्याही अवकाळीचा कहर सुरुच आहे. शासनाने केवळ फेब्रुवारी व मार्च महिन्यात झालेल्या अवकाळीसाठी मदत देण्याचा निर्णय घेतला. जिल्हा प्रशासनाच्या अहवालानूसार दिनांक २८ फेब्रुवारी व १ मार्च या दोन दिवसात ५० टक्याहून अधिक नुकसान झालेले ६ हजार १२१ हेक्टर १२ आर. क्षेत्र आहे.प्रत्यक्षात बाधीत क्षेत्र १५ हजार हेक्टरवर आहे.केवळ दोन महिन्यांच्या नुकसानीसाठी निर्णयराज्य शासनाने अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे बाधित क्षेत्राला विशेष मदत देण्याचा निर्णय घेतला तो केवळ दोन महिन्यांच्या बाधित क्षेत्रासाठी आहे. यामध्ये शासनाने शेतीपिके, फळपिके, बहुवार्षिक पिके या सर्व पिकासाठी दोन हेक्टरची मर्यादा ठरविली आहे.