शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

भंडारी, दुबेंची तक्रार करणाऱ्या फुलाडींचीही चौकशी

By admin | Updated: May 19, 2017 00:33 IST

क्लब हाऊसला दिलेल्या नाहरकत प्रमाणपत्रात स्वहस्ताक्षरात लिहिणाऱ्या घनश्याम भंडारी आणि अमित दुबे यांच्याविरुद्ध

‘एडीटीपी’तील हालचाली संशयास्पद : ‘एनओसी’वर पार्लरची नोंद केल्याचे प्रकरण लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : क्लब हाऊसला दिलेल्या नाहरकत प्रमाणपत्रात स्वहस्ताक्षरात लिहिणाऱ्या घनश्याम भंडारी आणि अमित दुबे यांच्याविरुद्ध ज्या कनिष्ठ कारकुनाने बुधवारी पोलिसात तक्रार नोंदविली त्या दिलीप फुलाडींचीच चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त हेमंतकुमार पवार यांनी दिले. हुक्का पार्लरच्या ना-हरकत प्रमाणपत्राचा मुद्दा गाजत असताना घनशाम भंडारी याला ‘मनोरंजन’ याघटकांतर्गत ‘क्लब हाऊस’ला ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र देण्यात आले. सहायक संचालक नगररचना विभागाने दिलेले हे ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र संशयात अडकले आहे. आयुक्त अनभिज्ञ अमरावती : दस्तुरखुद्द आयुक्तांनी या संपूर्ण प्रकाराबाबत संशय व्यक्त केला असून कुठल्या नियमाच्या आधारे आपण ‘क्लब हाऊस’ला एनओसी दिली, अशी विचारणा आयुक्तांनी नगररचना विभागाचे सहायक संचालक सुरेंद्र कांबळे यांना केली आहे. या प्रकरणातील आरोपी अमित दुबे हा एडीटीपी कार्यालयातून बाहेर पडताना फुलाडी यांची दुबेसोबत झालेली आपुलकीची भेट संशयाला वाव देणारी आहे. लिपिक फुलाडी यांचेकडून मनोरंजनासाठी एनओसी घेतल्यानंतर भंडारी यांनी त्या शासकीय कागदपत्रावर हुक्का पार्लर, पूल, कार्डरूम व व्हिडिओ गेम पार्लर अशी स्वहस्ताक्षरात नोंद केली होती. मनोरंजनासाठी ‘क्लब हाऊस’ चालविण्यासाठी घनशाम भंडारीने महापालिकेतील नगररचना विभागात ‘ना-हरकत’ मागितली. ती देण्यातही आली. तथापि मागील १५ दिवसांपासून हुक्का पार्लरचा मुद्दा गाजत असताना एडीटीपी सुरेंद्र कांबळे यांनी हा प्रकार आयुक्तांच्या कानावर घातला नाही. त्यामुळे ‘ना-हरकत’ देईपर्यंत व पुढील प्रकार घडेपर्यंत आयुक्त याविषयापासून अनभिज्ञ होते. २० पर्यंत पीसीआरर आरोपी घनशाम भंडारी आणि अमित दुबे यांना स्थानिक न्यायालयाने २० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींनी हा प्रकार पूर्वनियोजित पद्धतीने केला, अशी बाजू पोलिसांनी मांडली. आज नोंदविणार बयाण कोतवालीचे पीएसआय आर. एस. लेवटकर शुक्रवारी सुरेंद्र कांबळे, दिलीप फुलाडी आणि त्यांच्यालगत बसलेल्या कर्मचाऱ्यांचे बयाण नोंदविणार आहेत. बाहेरची व्यक्ती कार्यालयातील कपाटातून फाईल काढते, ती राजरोसपणे ठेऊनही देते, ही बाब या कार्यालयात उपस्थित असलेल्या कुठल्याही कर्मचाऱ्याच्या लक्षात येऊ नये, हे संशयास्पद आहे. भंडारी आणि दुबेंचा बेकायदेशीर प्रकार एडीटीपी कांबळेंनी मला सांगितला. त्यानुसार फौजदारीचे निर्देश दिलेत. इतकेच नव्हे तर देण्यात आलेल्या एनओसीबाबतबही विचारणा करण्यात आली. महापालिका स्तरावर चौकशी आरंभली आहे. - हेमंत पवार, आयुक्त