शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

शेवंती पुष्पप्रदर्शनीला उत्कृष्ट प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 23:06 IST

येथील अमरावती गार्डन क्लॅब व डॉ. एम.एम. शहा स्मृती प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ मार्गावरील महापौर बंगल्यानजीक असलेल्या माजी प्राचार्य उर्मी शहा यांच्या निवासस्थानी आयोजित ....

ठळक मुद्देएम.एम.शहा प्रतिष्ठानाचा उपक्रम : अभ्यासकांचीही गर्दी

आॅनलाईन लोकमतअमरावती : येथील अमरावती गार्डन क्लॅब व डॉ. एम.एम. शहा स्मृती प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ मार्गावरील महापौर बंगल्यानजीक असलेल्या माजी प्राचार्य उर्मी शहा यांच्या निवासस्थानी आयोजित शेवंती प्रदर्शनीत नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला १७ व १८ डिसेंबर दरम्यान आयोजित केलेल्या शेवंती प्रदर्शनीचे उदघाटन रविवारी सकाळी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते फित कापून व दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आले.शेवंती प्रदर्शनीत ठेवण्यात आलेल्या विविध शेवंतीच्या प्रजातींमुळे मी गदगदीत झालो. लोकांच्या जीवनात फुले आनंद फुलवितात, असे प्रतिपादन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी केले. यावेळी वनस्पतीशास्त्रांच्या अभ्यासकांनीही येथे प्रदर्शनी पाहण्यासाठी धाव घेतली होती. येथे ४० प्रकारच्या विविध नाविन्यपूर्ण प्रजातींची मेजवानी अभ्यासकांना मिळाली. याप्रसंगी एम. एम. शहा स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष कनक शहा, निर्मला देशमुख, गार्डन क्लॅबच्या अध्यक्ष सुचिता खोडके, सचिव रेखा मग्गीरवार, प्लॅस्टिक सर्जरीतज्ज्ञ भरत शहा, जागृती शहा, अनुराधा पाठक, नगरसेवक प्रणय कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. पहिल्याच दिवशी शेवंती फुलांच्या प्रदर्शनीला नागरिकांचा भक्कम प्रतिसाद मिळाला. सोमवारी पाचशे विद्यार्थी प्रदर्शनीची पाहणी करणार आहेत. डोरीस क्यून, चंद्रमा, किकिबोरी, टेमपेशन अशा विविध प्रकारच्या नर्सरीत तयार केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण प्रजाती या प्रदर्शनीत ठेवण्यात आल्या होत्या.मानवाला जगण्याची नवी दिशा ते देतात. शेवंतीची प्रदर्शनी पाहणाऱ्यांच्या मनात यावेळी आनंद फुलत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. अमरावतीकरांनी विविध प्रजातींची माहिती वनस्पतीशास्त्रतज्ज्ञ तथा माजी प्राचार्य ऊर्मी शहा यांच्याकडून जाणून घेतली. वनस्पतीशास्त्रात तज्ज्ञ असलेल्या माजी प्राचार्य यांनी तेवढ्याच उत्साहाने या ठिकाणी पाहणाऱ्यांना माहिती दिली. त्यांच्या निवासस्थानी अडीशे शेवंतीच्या प्रजाती ठेवण्यात आल्या आहे. त्यांचे आपल्या मुलांप्रमाणे त्या संगोपन करतात. त्यावर संशोधन करतात. मानवाला आॅक्सिजन देण्याचे महत्त्वाचे कार्य झाडे करीत असल्याने त्यांचे संवर्धन करणे गरजेचे असल्याचेही ऊर्मी शहा यांनी आपले मत व्यक्त केले.या ठिकाणी आल्यानंतर मन प्रसन्न झाले. एकाच वेळीस ४० प्रजाती या ठिकाणी बघायला मिळाल्या धकाधकीच्या जीवनात फुलांमुळे आनंद मिळतो.- पूजा कुलकर्णी, नागरिकनवीननवीन व्हरायटीज् बघायला मिळाल्या. ऊर्मी शहा यांचे कार्य प्रशंसनीय आहे. प्रत्येक नागरिकांनी एक तरी शेवंतीचे रोपटे घरी लावले पाहिजे.- संजय कुलकर्णी, नागरिक, अमरावतीसोमवारी चार शाळांचे पाचशे पेक्षा जास्त विद्यार्थी या ठिकाणी प्रदर्शनी बघण्यास येणार आहेत. येथे विदेशी प्रजातींच्या शेवंती ठेवण्यात आल्या आहेत.- ऊर्मी शहा,पुष्प प्रदर्शनी आयोजक