शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

श्रीमंतांना झुकते माप

By admin | Updated: July 13, 2016 01:09 IST

पालकमंत्री प्रवीण पोटे आणि गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्या आदेशान्वये महापालिका यंत्रणेने अतिक्रमण ...

अतिक्रमण मोहिमेबद्दल संशय : पथकाने पाठ फिरविताच ‘जैसे थे’अमरावती : पालकमंत्री प्रवीण पोटे आणि गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्या आदेशान्वये महापालिका यंत्रणेने अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली. मात्र आठवड्यापासून सुरुअसलेल्या या कारवाईत दुजाभाव केला जात आहे. श्रीमंतांना झुकते माप दिले जात असल्याचा प्रत्यय वारंवार येत असल्याने महापालिका यंत्रणेच्या भूमिकेविषयी संशय निर्माण झाला आहे. उभय मंत्र्यांच्या निर्देशाआधी पालिकेच्या यंत्रणेकडून किडूकमिडूक अतिक्रमण हटविण्यात येत होते. गुडेवारांची बदली झाल्यानंतर तर मोहिमेला ब्रेकच लागला. मोठी ओरड झाल्यानंतरच अतिक्रमणाची मोहिम राबविली जात होती. मात्र पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी थेट महापालिका गाठून आढावा बैठक घेतली व शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महिन्याचा अल्टीमेटम दिला. बैठकीनंतर दुसऱ्याच दिवसापासून धडाक्यात मोहीम राबविली गेली. तथापि पहिल्याच दिवसापासून पथक प्रमुख गणेश कुत्तरमारे व यंत्रणेतील अन्यकडून अतिक्रमण काढतेवेळी सापत्नभाव होत असल्याचा प्रत्यय आला. पंचवटीतील अन्य अतिक्रमणावर हातोडा फिरवितांना रोशनीचा ओटा वगळण्यात आला. बोंबाबोंब झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी तो ओटा पाडण्यात आला. कुत्तरमारेंच्या नेतृत्वातील पथकाला इतवाराबाजार, पठाण चौक, टांगापाडाव पुढे चांदणी चौकातील अतिरिक्त बांधकाम व फुटपाथ गडप केल्यांवर कारवाई करता आली नाही. या भागात अनेक विशिष्ठ समुदयातील नागरिकांनी पक्री घरे बांधकाम करून अतिक्रमण केले आहे. फुटपाथ तर शोधूनही सापडत नाही. अतिक्रमणधारकांनी कब्जात घेतलेला फुटपाथ कुत्तरमारे अ‍ॅन्ड टीम मोकळा करू शकले नाही. कुबडे ज्वेलर्सला मुभा का?कुबडे ज्वेलर्सने दुकानासमोर बनविलेला अर्धाच ओटा अतिक्रमण निर्मूलन पथकाने तोडून टाकला. मात्र वर रेलिश आणि रिलायन्सट्रेंडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण जैसे थे ठेवण्यात आले. याबाबत कुत्तरमारेंना विचारणा केली असता वरील दुकानांकडे व पार्किंगकडे जाण्यासाठी तो ओटा आवश्यक असल्याचे ते म्हणाले. यावरुन कुत्तरमारेंना कुबडे ज्वेलर्स व त्यांच्या अन्य भाडेकरुंच्या हिताचा किती विचार आहे, याचा प्रत्यय येतो. तोंडदेखल्या कारवाई इतवारा बाजार, चांदणी चौक, नागपुरी गेट, टांगा पडाव चौकातील अतिक्रमण धारकांना सोमवारी सूचना देण्यात आल्या. त्यामुळे अनेक फेरीवाल्यांनी हातगाड्यांच लावल्या नाही. तर अनेकांनी दुकानबाहेर साहित्य काढले नाहीत. पथक येवून गेल्यानंतर दुपारी पुन्हा अतिक्रमण पुन्हा थाटण्यात आले.