शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

‘अमृत’चा लाभ थेंबा-थेंबाने

By admin | Updated: November 24, 2015 00:21 IST

केंद्र सरकारच्या ‘अमृत’ योजनेतून राज्यातील ४२ शहरांना निधी मिळणार असला तरी, अद्यापपर्यंत राज्याला देय असलेला पहिला हप्ता केंद्र शासनाने दिलेला नाही.

अचलपूर पालिकेला प्रतीक्षा : तरतूदच नाही, निकषही कठीणअमरावती : केंद्र सरकारच्या ‘अमृत’ योजनेतून राज्यातील ४२ शहरांना निधी मिळणार असला तरी, अद्यापपर्यंत राज्याला देय असलेला पहिला हप्ता केंद्र शासनाने दिलेला नाही. यासाठी सविस्तर वार्षिक आराखडा राज्य शासनाने सादर केला नसल्याने राज्याला पहिल्या टप्प्यापासून वंचित रहावे लागले. उल्लेखनीय असे की, यात अमरावती जिल्ह्यातील अचलपूर नगरपालिकेचा समावेश आहे. शेजारील गुजरातसह आंध्रपदेश, मध्यपद्रेश, झारखंड, मिझोराम, उडिसा या राज्यांना अमृत योजनेतून निधी मंजूर होऊन त्याचा पहिला हप्ताही केंद्र शासनाने वितरित केला आहे. स्मार्टसिटी योजनेनंतर राज्यातील एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी केंद्र सरकारने ‘अटल मिशन फॉर रिज्युवेशन अ‍ॅन्ड अर्बन ट्रान्सफार्मेशन (अमृत)’ ही योजना जाहीर केली. या अंतर्गत प्रत्येक राज्याने वार्षिक आराखडा केंद्र सरकारला सादर करणे अपेक्षित होते. अमृत योजनेत राज्याने एक लाख लोकसंख्या असणाऱ्या ४२ शहरांचा समावेश केला. तथापि अद्यापपर्यंत राज्याच्या सविस्तर आराखड्याला अंतिम स्वरुप दिले नाही. त्यामुळे या ४२ शहरांच्या पायाभूत सुविधांसाठी निधी मिळालेला नाही. सद्यस्थिती पाहता अमृत योजनेसाठी निकषांची पूर्तीच होणे कठीण आहे. अचलपूर शहरासह बहुतांश शहरांमध्ये असलेली सद्यस्थिती पाहता योजनेचे निकष जसजसे पूर्ण होतील तसतसा या योजनेच्या निधीचा लाभ थेंबाथेंबाने मिळेल. योजनेच्या निकषानुसार ‘अमृत’ची वाट कठीण दिसत असली तरी अवघड मात्र नक्कीच नाही, हेदेखील खरे आहे. अमृत योजनेसाठी केंद्र शासन ५० टक्के राज्यशासन ३० टक्के आणि संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था २० टक्के निधी खर्च करणार आहे.