शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

बेलोरा विमानतळ विकासाच्या निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:53 IST

बहुप्रतीक्षेनंतर बेलोरा विमानतळाचे प्रस्तावित विस्तारीकरणासह विविध विकासकामांच्या निविदा थेट मंत्रालयातून निघाल्या आहेत.

ठळक मुद्देमुंबईची एजन्सी इच्छुक : डिझाईन, प्लॅनिंग, डेव्हलपमेंटला प्राधान्य

आॅनलाईन लोकमतअमरावती : बहुप्रतीक्षेनंतर बेलोरा विमानतळाचे प्रस्तावित विस्तारीकरणासह विविध विकासकामांच्या निविदा थेट मंत्रालयातून निघाल्या आहेत. यात एकूण सहा एजन्सी विकासकामे घेण्यासाठी इच्छुक असून, सुमारे आठ कोटी रुपयांतून टर्मिनल इमारत, एटीएस टॉवर उभारले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्याअनुषंगाने एक चमू नुकतीच विमानतळाची पाहणी करून गेली, हे विशेष.बेलोरा विमानतळाच्या विकासात अडसर ठरणारा जमिनीवरील अडथळ्यांचा अभ्यास (ओएलएस) नुकतेच आटोपला. ओएलएस सर्वेक्षणाद्वारा धावपट्टीवरून ४ ते १५ किमीपर्यंत अडथळे कॅमेऱ्यात कैद करण्यात आले. त्यामुळे विमानतळाचा विकासात अडसर ठरणारे पहिले पाऊल दूर झाले आहे.

पुणे- मुंबई विमानसेवेचा प्रस्तावबेलोरा विमानतळाहून पुणे, मुंबई अशी दररोज विमानफेरी सुरू करण्याच्या प्रस्ताव इंडिगो, स्पाईस जेटने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे सोपविला आहे. अमरावती, पुणे, मुंबई विमानाने प्रवास करण्याऱ्यांची संख्या अधिक असल्याचे विमान कंपन्यांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान, शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने टर्मिनल इमारत, एटीएस टॉवर निर्मितीसाठी निविदा काढल्या आहेत. मुंबई, दिल्ली, बंगळुरूसह नागपूर येथील काही एजन्सींनी विकासकामे घेण्यासाठी निविदांमध्ये सहभाग घेतला आहे. विमानतळाचे डिझाइन, प्लॅनिंग, डेव्हलपमेंट आणि पायाभूत सुविधांवर भर दिला जात आहे. धावपट्टीची लांबी वाढविणे, एटीएस टॉवरची निर्मिती, टर्मिनस बिल्डिंग निर्मिती, अग्निशमन यंत्रणा उभारणे, विश्रामकक्ष आदींचा समावेश असणार आहे. टर्मिनल इमारत, एटीएस टॉवर निर्मितीसाठी सुमारे आठ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याने त्यानुसार शासनाने निविदाप्रक्रिया राबविण्यास प्रारंभ केला आहे. एकूण सहा एजन्सींकडून निविदा प्राप्त झाल्या असून, आर्थिक बाबींची पूर्तता तपासल्यानंतर सर्वाधिक कमी किमतीच्या निविदा असलेल्या एजन्सीला कामे सोपविली जातील, अशी माहिती आहे. बेलोरा विमानतळाच्या पूर्णत्वासाठी पालकमंत्री प्रवीण पोटे, आ. सुनील देशमुख हे प्रयत्नशील आहेत.विकासकामांच्या निविदा निघाल्याने बेलोरा विमानतळाहून लवकरच विमाने उड्डाण घेतील, यात दुमत नाही. विशेषत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विमानतळाची प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्यासाठी आग्रही आहेत.- सुनील देशमुख,आमदार, अमरावती