शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
3
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
4
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
5
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
6
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
7
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
8
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
9
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
10
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
11
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
12
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
13
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
14
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
15
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
16
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
17
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
18
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
19
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
20
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात

जलप्रकल्पांचे पोट भरले

By admin | Updated: August 6, 2016 00:02 IST

जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस व धरणक्षेत्रात जोरदार पाऊस तसेच मध्यप्रदेशातील अतिवृष्टीने प्रकल्पात वाढती ...

८०.७८ टक्के साठा : उर्ध्व वर्धा, चंद्रभागा, पूर्णा, सपन प्रकल्पाचे एकूण १८ गेट उघडले अमरावती : जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस व धरणक्षेत्रात जोरदार पाऊस तसेच मध्यप्रदेशातील अतिवृष्टीने प्रकल्पात वाढती आवक यामुळे जिल्हा प्रमुख, मध्यम व लघु अशा एकूण ८२ प्रकल्पाचे साठवण क्षमतेच्या ८०.७८ टक्के साठा आहे. धरणांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ४ धरणांची दरवाजे उघडण्यात आलेली आहे. यामुळे नदी-नाले प्रभाविक होऊ शकतात. यासाठी खोलगट भागात राहणाऱ्या नागरिकांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.जिल्ह्यात एकमेव मुख्य प्रकल्प असणाऱ्या उर्ध्य वर्धा धरणात सध्या प्रकल्पीय संकल्पीय ५६४.०५ दलघमी साठयाच्या तुलनेत सध्या ३४१.५८ दलघमीसाठा शिल्लक आहे. ही ८५.७५ टक्केवारी आहे. मागील वर्षी याच तारखेत ४११.९४ दलघमी साठा शिल्लक होता ही ७३.०३ टक्केवारी होती.जिल्ह्यात ४ मध्यम प्रकल्पात आहे. यामध्ये शहानूर प्रकल्पात संकल्पपीय ४६.०४ दलघमी साठयाच्या तुलनेत ४३.१९ दलघमीसाठा शिल्लक आहे. ही ७४.२६ टक्केवारी आहे. मागील वर्षी आज तारखेत या धरणात ३६.७६ दलघमी साठा होता. व ही ७९.८४ टक्केवारी होती.चंद्रभागा प्रकल्पात सध्यास्थितीत ४६.०४ दलघमी साठयाच्या तुलनेत ३४.१९ दलघमी साठा आहे. ७४.२६ टक्केवारी आहे. मागील वर्षीयाच दिनांकाला ७९.८४ टक्के साठा होता. पुर्णा प्रकल्पात सध्या ३५.३७ दलघमी संकल्पीय साठयाच्या तूलनेत सध्या ३०.६१ जलसाठा आहे ही ७४.२१ टक्केवारी आहे. मागील वर्षी आजच्या दिनांकाला ७०.१६ टक्के साठा होता. सपन प्रकल्पात संकल्पीय ३९.६० दलघमी साठयाच्या तुलनेत २७.१५ दलघमी साठा आहे ही ७०.३४ टक्केवारी आहे. मागील वर्षी याच दिनांकाला ७०.३४ टक्के साठा होता. जिल्ह्यात एकूण ७७ लघुप्रकल्प आहे. यामध्ये प्रकल्पीय संकल्पीय १७९.८४ दलघमी साठयाच्या तुलनेत सध्या १३४.२८ दलघमी साठा आहे. ही ७४.६७ टक्केवारी आहे. मागील वर्शी याच दिनांकाला ६८.३४ दलघमी साठा होता. ही ३८ टक्केवारी होती. या सर्व प्रकल्पात एकूण ९०५.१५ दलघमी जलसाठयाच्या तुलनेत सद्यास्थितीत ७३१.१९ दलघमी साठा आहे की, ८०.७८ टक्केवारी आहे. मागील वर्षी याच दिनांकाला ५९४.५८ दलघमी साठा होता ही ६५.६९ टक्केवारी होती.गेल्या २४ तासात जिल्हत ६.६ मिमी पाऊस पउला सर्वाधिक २०.४ मिमी पाऊस चिखलदऱ्यात पउला. १ जून ते ४ आॅगस्ट या कालावधीत जिल्ह्यात ४५७.९ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असतांना ६९३.९ मिमी पाऊस पडला ही १५१.५ टक्केवारी आहे. वार्षिक सरासरीच्या ८५.२ टक्के हा पाऊस पडला आहे. (प्रतिनिधी)