शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

बी.एड, बी.पीएड. प्रवेशासाठी शिक्षकांना ‘लक्ष्यांक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:30 IST

अमरावती : गत काही वर्षांपासून शिक्षण (बी.एड.) आणि शारीरिक शिक्षण (बी.पीएड) महाविद्यालयांत विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पाठ फिरवली आहे. त्यामुळे ही ...

अमरावती : गत काही वर्षांपासून शिक्षण (बी.एड.) आणि शारीरिक शिक्षण (बी.पीएड) महाविद्यालयांत विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पाठ फिरवली आहे. त्यामुळे ही महाविद्यालये सुरू राहावी, यासाठी संस्थाचालक, प्राचार्यांकडून संबंधित शिक्षकांना विद्यार्थी प्रवेशाचे ‘लक्ष्यांक’ दिले जात आहे. आता शिक्षकांनी प्रवेशासाठी विद्यार्थी शोधमाेहिम चालविली आहे.

मार्चपासून कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाले. तेंव्हापासून शाळा, महाविद्यालये बंद आहे. तर दुसरीकडे काही वर्षांपासून शिक्षक भरती बंद असल्याने हजारो बी.एड्, बी.पीएड्. पदवीधारक नोकरीच्या शोधात आहेत. उच्च शिक्षण घेऊनसुद्धा नोकरी मिळत नसेल तर अशी पदवी प्राप्त करणे कुचकामी ठरणारी असल्याची भावना पदवीधारकांची आहे. रोजगाराची संधी नसल्याने अनेकांनी बी.एड, बी.पीएड. शिक्षण नको, अशी विद्यार्थ्यांची मानसिकता आहे. त्यामुळे अमरावती विभागातील अनुदानित व विनाअनुदानित बी.एड, बी.पीएड. महाविद्यालये प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. काही महाविद्यालये अनुदानित असल्याने पटावर विद्यार्थी संख्या दर्शवून ती सुरू ठेवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. मात्र, एनटीसीएने निकष, अटी कठोर केल्यामुळे यंदा संस्थाचालक, प्राचार्यांकडून शिक्षकांना प्रवेश असेल तर नोकरी सुरक्षित असा फतवा जारी केला आहे. त्यामुळे शिक्षकांचे प्रवेशासाठी विद्यार्थी शोधमोहीम चालविली आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथील श्री. स्वामी समर्थ शारीरिक शिक्षण महाविद्यालय, बुलडाणा येथील कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, मलकापूर येथील दादासाहेब रमेशसिंह राजपूत शारीरिक शिक्षण महाविद्यालय व बी.के. पाटील शारीरिक शिक्षण महाविद्यालय ही चार बी.पीएड्‌. कॉलेज बंद झाली आहे.

-------------------------

विभागात अशी आहे कॉलेजची संख्या

बी.पीएड- ४६

एम.एड- ३

बी.पीएड- १८

एम.पीएड- ३

-------------------------

बी.एड, बी.पीएड. महाविद्यालयांत एका युनिटमध्ये ५० प्रवेश क्षमता असून, ती सुद्धा होत नाही. प्रवेशासाठी विद्यार्थी मिळविणे जिकरीचे काम झाले आहे. एनटीसीएच्या निकषानुसार चार बीपीएड कॉलेज बंद करण्यात आले आहे.

- केशव तुपे, सहसंचालक, उच्च शिक्षण अमरावती