शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळाच्या संरक्षण भिंतीला तारांचा अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 22:24 IST

राज्य शासनाने बेलोरा विमानतळाच्या विकासाची जबाबदारी घेतली असली तरी विमानतळ संरक्षण भिंतीला वीज तारांचा अडसर कायम आहे.

ठळक मुद्देमहावितरणकडे प्रस्ताव पाठविलावळण रस्त्यावरून वाहतूक अशक्य

आॅनलाईन लोकमतअमरावती : राज्य शासनाने बेलोरा विमानतळाच्या विकासाची जबाबदारी घेतली असली तरी विमानतळ संरक्षण भिंतीला वीज तारांचा अडसर कायम आहे. वीज तारा काढल्याशिवाय यवतमाळ-अकोला-बेलोरा टी-पॉइंटपर्यंत वळण रस्ता सुरू करणे अशक्य असल्याचे वास्तव आहे.शासनाने बेलोरा विमानतळाचा विकास करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. त्याअनुषंगाने १४ डिसेंबर २०१७ रोजी शासननिर्णय घेण्यात आला. जुना शासननिर्णय रद्द करून नव्याने विकासाचे धोरण ठरविले. त्याकरिता ७५ कोटी मंजूर करण्यात आले आहे. त्यापैकी १५ कोटी रुपये ४ जानेवारी रोजीच्या शासननिर्णयाद्वारे निर्गमित करण्यात आले. पालकमंत्री प्रवीण पोटेंसह अन्य लोकप्रतिनिधी विमानतळ विकासासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करीत आहेत. मात्र, गत दोन वर्षांपासून बेलोरा ते यवतमाळ मार्गावर निर्माणाधीन ३.८० कि.मी. लांबीचा रस्ता सुरू झाल्याशिवाय विमानतळाची विकासकामे सुरू करता येत नाहीत. विमानतळाच्या विस्तीर्ण परिसरातील वीज तारा त्वरित काढाव्यात, यासाठी विमानतळ प्रबंधकांकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. याबाबत महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना दोन वेळा स्मरणपत्रदेखील देण्यात आले.बेलोरा विमानतळाच्या सध्याच्या धावपट्टीची लांबी १३७२ मीटर असून, ती १८५० मीटर केली जाणार आहे. टर्मिनल इमारत उभारणे, फायर स्टेशन, एटीसी टॉवर निर्मिती, अप्रन क्षमतेत वाढ, बडनेरा-यवतमाळ वळण रस्ता, विद्युत वाहिन्यांची पुनर्बांधणी, रस्ते चौपदरीकरण, पाणीपुरवठा व्यवस्था आदी कामे प्रस्तावित आहेत. विमानतळ परिसराचे ओएलएस सर्वेक्षण होणार आहे. यात विमानांचे टेक आॅफ, एटीएस टॉवर, रन-वे निर्मितीत अडचणी, धावपट्टीची वाढ करताना तांत्रिक त्रुटींबाबत दिल्ली येथील डीजेसीएसकडून ना-हरकत प्रमाणपत्र मिळविले जाणार आहे.वीज तारांमुळे विकासात अडसर येत आहे. विकासकामांसाठी निधी मंजूर झाला असून, लवकरच ओएलएस सर्वेक्षण होईल. वीज तारा काढताच संरक्षण भिंतीचे काम सुरू करू. महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत पत्रव्यवहार सुरू आहे.- एम.पी. पाठक , प्रबंधक, बेलोरा विमनातळ