शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

इतवारा बाजारात बॅरिकेड्‌स, पोलिसांची करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:13 IST

अमरावती : इतवारा बाजारात होत असलेली गर्दी टाळण्यासाठी या परिसरातील सर्व रहदारीचे रस्ते रविवारी सकाळी बॅरिकेड्‌स लावून बंद करण्यात ...

अमरावती : इतवारा बाजारात होत असलेली गर्दी टाळण्यासाठी या परिसरातील सर्व रहदारीचे रस्ते रविवारी सकाळी बॅरिकेड्‌स लावून बंद करण्यात आले. त्यामुळे रविवारी इतवारा बाजारकडे जाणाऱ्या रस्त्यावर कुठलीही हातगाडी दिसून आली नाही, त्यामुळे कुठेही गर्दी झाली नाही. चित्रा चौक ते टांगापडाव दरम्यानच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात हातगाड्या लागत असल्यामुळे गर्दी वाढली होती. त्यामुळे वाहतुक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. ही बाब पाहता पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी २३ मे रोजी इतवारा बाजार परिसराचा आढावा घेऊन पोलिसांनी सूचना दिल्या. त्यानुसार रविवारी चित्रा चौक ते टांगापडावदरम्यानच्या संपूर्ण गल्लीबोळात बॅरिकेड्‌स लावून बंद करण्यात आल्या. तसेच इतवारा बाजार परिसरात व चित्रा चौकातून टांगापडावकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली. या परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

बॉक्स

रहिवासी क्षेत्रात जीवनावश्यक वस्तू खरेदी करा

नागरिकांनी फळ व भाजीपाला खरेदीसाठी इतवारा बाजारात येऊ नये व गर्दी करू नये, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी आपापल्या रहिवासी परिसरातूनच जीवनावश्यक वस्तू व फळ, भाजीपाल्याची खरेदी करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.