शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
3
Shivalik Sharma: मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला अटक, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
4
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
7
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
8
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
9
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
10
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
11
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
12
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
13
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
14
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
15
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
16
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
17
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
18
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
19
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...

बंजारा समाजाचा तीज महोत्सव प्रारंभ

By admin | Updated: August 31, 2015 00:06 IST

शहरातील सर्व बंजारा बांधव व भगिनींच्या उपस्थितीत तांड्याचे नायक एम.एच राठोड यांच्या निवासस्थानी शनिवारी तीज रोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

अमरावती : शहरातील सर्व बंजारा बांधव व भगिनींच्या उपस्थितीत तांड्याचे नायक एम.एच राठोड यांच्या निवासस्थानी शनिवारी तीज रोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी बंजारा तांड्याचे नायक एम.एच. राठोड, प्रल्हाद चव्हाण, कारभारी उदय राठोड, अमरसिंग राठोड, राम पवार, जंयत वडते, अजाबराव राठोड, चंदन राठोड, भावराव चव्हाण, एस.आर.जाधव, अ‍ॅड. राम आडे, पंडित राठोड, सुभाष चव्हाण, मोहन चव्हाण, हिरालाल जाधवविशाल जाधव, बालकदास जाधव, विजू आडे, एल.पी. राठोड, बबन राठोड,सुमेरसिंग राठोड, जी.एच. राठोड, के.डी. चव्हाण, उदय पवार आदींची उपस्थिती होती.श्रावण महिन्यात दरवर्षी ग्रामीण भागासह शहरातही बंजारा समाजाच्यावतीने उत्साहात तीज महोत्सव साजरा केला जातो. यात मुली, महिला व पुरुषांचाही सहभाग असतो. प्राचीनकाळी हा समाज व्यवसायानिमित्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकंती करीत होता. पावसाळ्याच्या दिवसांत शेती व्यवसायाकरिता पुन्हा एकत्र येत असे. त्यावेळी विविध कार्यक्रम साजरा करून वेगळी संस्कृती निर्माण केली. त्याचप्रमाणे संस्कृतीचा एक भाग असलेला हा तीज उत्सव होय. हा महोत्सव ९ दिवस चालतो. दररोज तिजेला पाणी घालण्याचे नियोजन केले जातात. त्यानिमित्ताने बंजारा गीतांवर नृत्य सादर केले जातात. यामागील उद्देश असा की, कुमारी मुलींना भावी जीवनात चांगला वर मिळो, तिला सुख-समृद्धी व भरभराटी मिळो, यासाठी निसर्गराज्याला प्रार्थना केली जाते.शनिवारपासून तीज उत्सवाला सुरुवात झाली असून ५ सप्टेंबर रोजी ढंबोळीचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये राधा-कृष्णाची पूजाअर्चा केली जाईल. तसेच ६ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते ६ वाजतादरम्यान तीज विसर्जनाचा कार्यक्रम स्थानिक संस्कार लॉन विद्यापीठ मार्ग येथे होईल. याप्रसंगी समाजातील प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना पुरस्कृत केले जाईल.