शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

घुईखेड येथे बेंडोजी बाबा प्रकटदिन उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 01:25 IST

तेराव्या शतकातील संत बेंडोजी महाराज यांच्या प्रकटदिनानिमित्त समाधीचे दर्शन व महाप्रसादासाठी बुधवारी हजारो भाविक भक्तांची गर्दी घुईखेड येथील संस्थानात उसळली होती. चांदूर रेल्वेहून १७ कि.मी. अंतरावर असलेल्या घुईखेड येथे संत बेंडोजी महाराज यांच्या प्रकटदिन पर्वाला ३ एप्रिलपासून सुरुवात झाली.

ठळक मुद्देभाविकांची मांदियाळी : दर्शनासाठी रांगा, हजारोंनी घेतला महाप्रसादाचा लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : तेराव्या शतकातील संत बेंडोजी महाराज यांच्या प्रकटदिनानिमित्त समाधीचे दर्शन व महाप्रसादासाठी बुधवारी हजारो भाविक भक्तांची गर्दी घुईखेड येथील संस्थानात उसळली होती.चांदूर रेल्वेहून १७ कि.मी. अंतरावर असलेल्या घुईखेड येथे संत बेंडोजी महाराज यांच्या प्रकटदिन पर्वाला ३ एप्रिलपासून सुरुवात झाली. ११ एप्रिलला काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने सांगता झाली. संत बेंडोजी महाराज यांनी इ.स. १३३७ मध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी संजीवन समाधी घेतली. तेव्हापासून दर्शन सोहळा दरवर्षी आयोजित केला जातो. काही दिवसांपूर्वीच या सोहळ्याला ६८० वर्षे पूर्ण झाली.घुईखेड येथे १० एप्रिल रोजी सकाळी सर्वप्रथम संत बेंडोजी बाबा ग्रंथसमाप्ती व पालकीची मिरवणूक काढण्यात आली. ११ एप्रिलला सकाळी आळंदी येथील ॉ उमेश महाराज जाधव यांचे काल्याचे कीर्तन व भाविकांच्या उपस्थितीत आरती झाली. यावेळी अन्नदाते अ.भा. ग्रामीण पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रवीण शर्मा व पत्नी नेहा शर्मा यांचा शाल-श्रीफळ देऊन संस्थानतर्फे सपत्नीक सत्कार करण्यात आला. आरतीनंतर मंदिर परिसरात भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. आयोजनाकरिता बेंडोजी बाबा संस्थानचे अध्यक्ष वसंतराव घुईखेडकर, सचिव बाळासाहेब देशमुख, कोषाध्यक्ष दिनकर घुईखेडकर, सदस्य प्रवीण घुईखेडकर, विजय घुईखेडकर, विवेक घुईखेडकर, शशिकांत चौधरी यांच्यासह गावातील नागरिकांनी अथक परिश्रम घेतले.देहूत गायिली जाते आरतीसंत बेंडोजी महाराजांचा इतिहास प्राचीन असून, संस्थानने सन १३३७ साली तयार केलेला भालदार व चोपदारांचा बिल्ला आजही विश्वस्तांजवळ असून, तो प्राचीन इतिहासाची साक्ष देत आहे. त्यांचे विदर्भातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात लाखो अनुयायी आहेत. देहू येथील संत तुकाराम महाराज मंदिरात आजही दररोज बेंडोजी महाराजांची काकड आरती गायिली जाते.