शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

वीटभट्ट्यांच्या प्रदूषणाने बडनेरा शहर धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 22:15 IST

दीडशे वीटभट्ट्यांमुळे बडनेरा शहर व परिसर प्रदूषणाच्या विळख्यात सापडले असून, नियमानुसार केवळ एकमेव चिमणी भट्टी उभारण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वीटभट्ट्या सुरू असाव्यात मात्र अनेक वर्षांपासून प्रदूषण व महसूल विभाग याविषयी चुप्पी का साधतात, असा सवाल एकमेव असणाऱ्या चिमणीने उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देदीडशे भट्ट्यांमागे एकमेव चिमणी : प्रदूषण विभागाची अर्थपूर्ण चुप्पी

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा/अमरावती : दीडशे वीटभट्ट्यांमुळे बडनेरा शहर व परिसर प्रदूषणाच्या विळख्यात सापडले असून, नियमानुसार केवळ एकमेव चिमणी भट्टी उभारण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वीटभट्ट्या सुरू असाव्यात मात्र अनेक वर्षांपासून प्रदूषण व महसूल विभाग याविषयी चुप्पी का साधतात, असा सवाल एकमेव असणाऱ्या चिमणीने उपस्थित केला आहे.अमरावती शहरासह इतरत्रही बडनेऱ्यातूनच बांधकामासाठी विटा पुरविल्या जातात. वीटभट्ट्यांसाठी बडनेरा शहर सर्वदूरपर्यंत चर्चेत आहे. दरवर्षी येथे वनजमीन, महसूलच्या जागेवर नियमबाह्य नवीन विटभट्ट्या उभ्या होत आहे. लाखो रूपयांची उलाढाल वीटभट्टी व्यवसायातून होत आहे. बहुतांश वीटभट्ट्या अवैध उभारल्या असून, महसूल विभागाची यात मोठी ‘वसुली’ मोहीम सुरू आहे. महसूल विभागासह अन्य सर्वच प्रशासनाच्या आशिर्वादाने येथे वीटभट्ट्यांचे प्रस्थ वाढले आहे. सुमारे दीडशे वीटभट्ट्या असल्याची माहिती आहे. बडनेरा शहरालगत शाळा-महाविद्यालय परिसराला वीटभट्ट्यांच्या प्रदूषणाचा प्रचंड त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. या विटभट्ट्यांमुळे बडनेरा शहर व परिसर प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे.वीटभट्ट्यांचा धुराळा हवेत पसरावा यासाठी प्रत्येक वीटभट्टी चालकांना चिमणी बसविणे बंधनकारक आहे. मात्र, बडनेरा शहर व परिसरातील वीटभट्ट्यांमध्ये केवळ एकमेव चिमणी भट्टी सुरू आहे. नियमबाह्य वीटभट्ट्या सुरू असताना यातून निघणाºया प्रदूषणाकडे प्रदूषण विभाग का चुप्पी साधून आहे, याबाबत बडनेरा शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. प्रदूषणासह वीटभट्ट्यांचे तापमान परिसरातील महाविद्यालय आणि तेथून ये-जा करणाऱ्यांसाठी आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक ठरत आहे. या प्रदूषणाचा धोका लक्षात घेवून प्रदूषण विभागाने आवश्यक ती पावले उचलण्याची गरज आहे.‘महसूल’ची वसुली जोरात?शहरासह बडनेऱ्यात नियमबाह्य विटभट्ट्या सुरु असताना त्या बंद करण्याऐवजी महसूल विभागाच्या ‘वसुली’ने त्या राजरोसपणे सुरू आहेत. तलाठी, नायब तहसीलदार, तहसीलदार यांचा आशीर्वादाने हा प्रकार सुरू असल्याची विश्वसनीय माहिती आहे. गत दोन दिवसांपूर्वी शहरासह बडनेºयातील अवैधरीत्या सुरू असलेल्या वीटभट्ट्या बंद करण्यासाठी वनविभागाने नोटीस बजावल्या .वनविभागाला ते े दिसून आले, तर महसूल विभागाला का दिसू नये, यातच गुपित दडले आहे.