शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

शहरात आॅटोचालकांची बेशिस्त वाहतूक

By admin | Updated: July 3, 2017 00:31 IST

शहरात आॅटोचालकांच्या मनमानीने अमरावतीकर त्रस्त झाले आहेत. बेशिस्त वाहतुकीमुळे जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहे.

नागरिक त्रस्त : गुन्हेगारीचे वाढते प्रमाण, ग्रामीण भागातील आॅटोंचा सर्रास शिरकावलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात आॅटोचालकांच्या मनमानीने अमरावतीकर त्रस्त झाले आहेत. बेशिस्त वाहतुकीमुळे जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहे. काही दिवसांत आॅटो चालकांचे गुन्हेगारीतील प्रमाण वाढत असल्याचे विविध घटनांवरून निदर्शनास येत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आॅटो चालकांच्या या कारभारावर अंकुश लावण्याचा प्रयत्न पोलीस व आरटीओमार्फत सुरू झाले आहे. नियमबाह्य पद्धतीने चालणाऱ्या आॅटोवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.शहरात पाच हजारांच्यावर आॅटोची संख्या आहे. मात्र, बहुतांश आॅटोचालक नियमबाह्य पद्धतीने वाहतूक करीत आहे. आॅटो थांबा असतानाही आॅटोचालक रस्त्यावरच वाहने उभे करून प्रवासी घेतात आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करतात. त्यामुळे दररोज किरकोळ अपघातही वाढले आहेत. अतिक्षमतेचीवाहतूक, तर सर्रासपणे शहरात सुरू असल्यामुळे अपघातास आमंत्रण मिळत आहे. वाहतूक शाखेचे व पोलीस ठाण्यातील पोलिसांसमोरच बेशिस्त वाहतूक होत आहे. मात्र, कोणतेही पोलीस आॅटोचालकांना हटकत नाहीत. प्रवाशांकडून मनमानी भाडे उकळून त्यांची पिळवणुुक करण्यात आॅटो चालकानी तर कळसच गाठला आहे. पॉवर हाऊसजवळील आॅटो चालक ट्रव्हल्स प्रवाशांना शहरात सोडण्यासाठी तब्बल २०० ते ३०० रुपये भाडे आकारतात. ही एकप्रकारे प्रवाशांची लूटच आहे. शहरात सर्वत्र आॅटोच-आॅटो दिसून येतात. यामध्ये विना परवाना व कालबाह्य आॅटोचेही अधिक प्रमाण वाढले आहे. खटारा व कालबाह्य आॅटोद्वारे वाहतूक करणे प्रवाशांच्या जीवावर बेतणारे ठरू शकते. केवळ पैसा कमविण्याच्या हेतूने हे आॅटोचालक प्रवासांच्या जीवाशी खेळत आहे.