शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ वाघिणीच्या हालचाली टिपण्याचे प्रयत्न

By admin | Updated: April 12, 2015 00:18 IST

पोहरा मार्गावरील मालखेडच्या जगंलात वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात पट्टेदार वाघ आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

वनविभाग सतर्क : पाणवठे, निर्जनस्थळी लावले ट्रॅप कॅमेरेअमरावती : पोहरा मार्गावरील मालखेडच्या जगंलात वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात पट्टेदार वाघ आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. वनविभागाने पाणवठे व निर्जनस्थळी ट्रप कॅमेरे वाढविले असून वाघिणीच्या हालचालीचे निरीक्षण सुरु केले आहे. हे पट्टेदार वाघीण वर्धा जिल्ह्यातील बोर अभयारण्यातील असून ती अमरावतीच्या जगंलात वास्तव्यास आली आहे. चांदूररेल्वे मार्गावर पोहरा जगंलाचा भाग असून मालखेड गावाजवळ जगंल आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी मालखेड जंगलात गस्तीवर असणाऱ्या वनकर्मचाऱ्यांना पट्टेदार वाघिणीच्या पायाचे ठसे आढळून आले होते. त्यामुळे वाघिणीचे वास्तव्य असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले. हा वाघ कोठून आला व कशासाठी आला याचे निरीक्षण करण्यासाठी वनविभागाने जगंलातील पानवठे व निर्जनस्थळी ट्रॅप कॅमेरे लावले आहे. तीन दिवसांपासून वाघाच्या हालचालींवर वनविभागाने लक्ष केंद्रित केले असता एका ट्रॅप कॅमेऱ्यात वाघ फिरत असताना आढळून आला आहे. ही वाघीण कोठून आली? याचा शोध घेण्याकरिता वनविभागाने वर्धा जिल्ह्यातील बोर अभयारण्यातील वनविभागाशी संपर्क केला. तेथील पट्टेदार वाघाच्या अंगावरील काळे-पिवळे पट्टे व अमरावतीच्या जंगलात आढळलेल्या वाघाच्या अंगावरील काळे-पिवळे पट्टयाची तुलना करण्यात आली. त्यामध्ये अमरावतीच्या जंगलात आढळलेली वाघीण ही बोर अभयारण्यातीलच असल्याचे स्पष्ट झाले आहे. वाघीण ही दुसऱ्या ठिकाणच्या जंगलात जाऊन स्वत:चे वास्तव्य सिध्द करीत असते. त्यासाठी ती अमरावतीच्या जंगलात वास्तव्यास आली असावी, असा तर्क वनविभाग व काही वन्यजीव अभ्यासकांनी काढला आहे. उपवनसंरक्षक नीनू सोमराज यांच्या मार्गदर्शनात शिकारी प्रतिबंधक पथकाचे डब्ल्यू. शेख, पी.टी.वानखडे, अमोल गावनेर, फिरोज खान, सतीश उमक, चंदू ढवळे, मनोज ठाकूर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. नागरिकांना सतर्कतेचा इशारापोहऱ्याजवळील मालखेड जंगलात वाघीण आढळून आल्याचे स्पष्ट झाले आहे. वाघिणीच्या हालचाली टिपण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले असून वनकर्मचारी जंगलात २४ तास गस्त घालत आहेत. ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये जंगलात फिरताना काही नागरिक आढळून आले आहेत. त्यांची चौकशी वनविभागाने सुरु केली असून नागरिकांची जंगलातील भ्रमंती वाघांसाठी धोकादायक ठरु शकते, असा इशारा वनविभागाने दिला आहे. अमरावतीच्या जंगलात आढळलेली वाघीण बोर अभयारण्यातील असल्याचे निदर्शनास येत आहे. वाघिणीच्या हालचाली टिपण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले असून वनकर्मचाऱ्यांची गस्त वाढविण्यात आली आहे. नागरिकांनीही जंगलात ये-जा करणे टाळावे. तसेच सावधगिरी बाळगावी. वाघ दिसल्यास त्वरित वनविभागाशी संपर्क करावा. - संजीव गौड, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक).