शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

संत्रा झाडावर ‘कोलत्या’ रोगाचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2016 00:03 IST

दिवसागणिक नवीन समस्यांच्या विळख्यात सापडणाऱ्या बळीराजावर पुन्हा नवीन संकट कोसळले आहे.

कोट्यवधींचे नुकसान : झाडांचे शेंडे वाळले, शेतकरी हवालदिलनरेंद्र जावरे  परतवाडादिवसागणिक नवीन समस्यांच्या विळख्यात सापडणाऱ्या बळीराजावर पुन्हा नवीन संकट कोसळले आहे. तालुक्यातील हजारो संत्राझाडावर कोलत्या (शेंडे मर, पायकूज व मुळकूज) या रोगाने आक्रमण केल्याने झाडांचे शेंडे वाळू लागले आहे. परिणामी शेतकऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची भीती वर्तविली. शासनाने प्रथमच या रोगावर उपाययोजना करण्याची मागणी केली. अचलपूर तालुक्यात संत्रा उत्पादक शेतकरी अधिक आहेत. धोतरखेडा, एकलासपूर, मल्हारा, गौरखेडा, हनवतखेडा, वडगाव, दर्याबाद, रासेगाव, चमक, कविठा, देऊरवाडा परिसरात संत्रा उत्पादन घेण्यात येते. यावर्षी प्रथमच संत्रा झाडावरील शेंडे अचानक वाळू लागल्याने हिरव्या फांद्यांसह आंबिया बहराची संत्री वाळून जमिनीवर गळत आहेत. ‘कोलत्या’ रोगाचे निदान लागल्यावर शास्त्रीय भाषेत शेंडेमर, पायकूज, मुळकूज रोग असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. कोट्यवधी रुपयांच्या या व्यवहारात अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गतवर्षी एक कोटी रुपयांचा ‘सेस’ प्राप्त झाला होता. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची सर्वाधिक मदार आंबिया बहरावर असताना यावर्षी बहरलेल्या झाडांवर कोलत्या रोगाच्या आक्रमणाने बळीराजा हवालदिल झाला आहे.संत्राची झाडे पिवळी पडलेली आहेत व काही झाडे सुकत आहेत. झाडावरील संत्रा फळे पिवळे पडून गळत आहे. झाडाची मुळे सडलेल्या आढळून आल्या. रोगग्रस्त मुळांचा जाळवा व माती प्रयोगशाळेत फायटोप्थोरा बुरशीच्या निदानाकरिता घेण्यात आली.नागपूर येथील लिंबूवर्गीय फळ प्रक्रिया केंद्राची चमू दाखलसंत्रा झाडांचे शेंडे वाळू लागल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी त्याची माहिती तालुका कृषी अधिकारी आशिष सातव यांना दिली होती. त्यांनी नागपूर येथील लिंबूवर्गीय फळ प्रक्रिया केंद्राशी संपर्क साधून स्थिती सांगितली होती. त्यानुसार शनिवारी नागपूरहून आलेल्या चमूने दर्याबाद, हनवतखेडा आदी परिसरातील संत्रा बागांना भेटी देवून पाहणी केली व शेतकऱ्यांना काही सूचना दिल्या. या चमूमध्ये जी. एम. बोरकर, डी. ओ. गर्ग आणि अशोककुमार यांचा समावेश होता.