शहरं
Join us  
Trending Stories
1
Panvel Municipal Election 2026: पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच भाजपाने तीन ठिकाणी उधळला गुलाल
2
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
3
संतापजनक! चालत्या कारमध्ये दोन तास लैंगिक अत्याचार, तरुणीला मारहाण; मध्यरात्री रस्त्यावर फेकून दिले
4
भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कधी बनणार; पाकिस्तानचा समावेश टॉप १० मध्ये आहे का?
5
आता कितीही धुके असू दे, वेगवान वंदे भारत ट्रेन थांबणार नाही; भारतीय रेल्वेने उचलले मोठे पाऊल!
6
कोण होती तातियाना श्लॉसबर्ग? अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांच्या नातीचा ३५व्या वर्षी मृत्यू
7
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
8
"अहंकार दुखावल्याने त्याने मलाच सिनेमातून काढून टाकलं...", बॉलिवूड दिग्दर्शकाकडून अक्षय खन्नाची पोलखोल
9
शिंदेसेनेत उफाळली नाराजी; ५०० हून अधिक होते इच्छुक
10
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
11
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
12
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
13
सावधान! ChatGPT वर तुमची माहिती गुप्तपणे सेव्ह होते; टाळायचे असेल तर या ५ स्टेप्स फॉलो करा
14
अर्ज दाखल करताच अजित पवारांच्या उमेदवाराचा मृत्यू, ३ जणांना रात्री प्रवेश, सकाळी तिकीट; काँग्रेसचे २६ उमेदवार गेले कुठे...?
15
VHT 2025 : महाराष्ट्र संघासाठी 'संकटमोचक' ठरला ऋतुराज! शतकी खेळीसह टीम इंडियातील जागेवरही टाकला रुमाल
16
झटपट, पटापट! स्मार्टफोन, इंटरनेट नसेल तरी नो टेन्शन; 'हा' नंबर डायल, काही सेकंदात UPI पेमेंट
17
“राज ठाकरेंच्या जास्त जागा जिंकून याव्यात ही आमची इच्छा, आम्ही बहुमत मिळवू”: संजय राऊत
18
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
19
Gold Silver Price Today: नववर्षाच्या आदल्या दिवशीच गुड न्यूज; सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, पटापट चेक करा १८, २२, २४ कॅरेटचे दर
20
Nashik Municipal Corporation Election : आयारामांची चांदी! भाजपचे २२, शिंदेसेनेचे १९; निष्ठावंतांच्या नशिबी सतरंज्या उचलण्याचीच वेळ
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट सिटी’साठी ‘त्या’ जागेला मंजुरी

By admin | Updated: December 4, 2015 00:37 IST

येथील महादेव खोरी, छत्रीतलाव परिसरात ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प साकारण्यासाठी जागेचे आरक्षण बदलविणे,

अमरावती : येथील महादेव खोरी, छत्रीतलाव परिसरात ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प साकारण्यासाठी जागेचे आरक्षण बदलविणे, जागा अधिग्रहण आणि हस्तांतरण करणे तसेच या जागेबाबत काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास एमआयडीसी, वडद परिसरात हा प्रकल्प साकारण्यात यावा, असा ठराव गुरुवारी महापालिका सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला.महापालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महापौर चरणजितकौर नंदा यांच्या पीठासीनाखाली ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प आराखडा मान्यतेसाठी विशेष सभा पार पडली. आयुक्त चंद्रकांत गुडेवार, उपमहापौर शेख जफर, नगरसचिव मदन तांबेकर यांनी कामकाज सांभाळले. सभेच्या प्रारंभीच रिपाइंचे गटनेता प्रकाश बनसोड, नगरसेविका जयश्री मोरे, बसपा गटनेता गुंफाबाई मेश्राम, कांचन ग्रेसपुंजे, जावेद मेमन, विजय नागपुरे आदींनी बडनेरा परिसरातच ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प साकारण्यात यावा, ही मागणी रेटून धरली. बडनेरा येथील शेतकऱ्यांच्या जमिनी एमआयडीसी आणि वडद भागात असून हा परिसर अविकसित आहे. निसर्गरम्य, डोंगरी भाग हे या परिसराचे वैशिष्ट्य आहे. कोंडेश्वर येथील महादेव मंदिर, खटेश्वर मंदिर आणि तलावासह हा भाग निसर्गाच्या कुशीत वसलेला आहे. या परिसरात ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प साकारल्यास अविकसित भागाचा विकास होईल, असे प्रकाश बनसोड म्हणाले. प्रारंभी काही मुद्यावर शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास नकार दर्शविला होता. मात्र, आता याबाबत शेतकरी सकारात्मक दिसून येत आहेत.