शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

दलितवस्ती विकास कामांना मंजुरी

By admin | Updated: March 28, 2015 00:09 IST

महानगरातील दलित वस्त्यांमधील विविध विकासकामांना शुक्रवारी स्थायी समितीने मंजुरी प्रदान करताना

स्थायी समितीचा निर्णय : रखडलेले प्रस्ताव लागले मार्गीअमरावती : महानगरातील दलित वस्त्यांमधील विविध विकासकामांना शुक्रवारी स्थायी समितीने मंजुरी प्रदान करताना प्रभारी शहर अभियंता ज्ञानेंद्र मेश्राम यांना कायमस्वरुपी पदस्थापना देण्याचा निर्णय घेतला. तसेच नगरोत्थान योजनेतंर्गत एचडीएफसी कडून ८ कोटी ३८ लाख रुपयांच्या वाढीव कर्ज प्रकरणाला मंजुरी देण्यात आली.स्व. सुदामकाका देशमुख सभागृहात सभापती विलास इंगोले यांच्या पीठासीनाखाली स्थायी समितीची सभा पार पडली. यावेळी कुसूम साहू, योजना रेवस्कर, राजेंद्र तायडे, सारीका महल्ले, कांचन उपाध्याय, अजय गोंडाणे, सुनीता भेले, भारत चव्हाण, हफीजाबी युसूफशाह, शेख हमीद शद्दा, दिंगबर डहाके, अंजली पांडे, तुषार भारतीय आदी उपस्थित होते. दरम्यान प्रशासनाने स्थायी समितीच्या निर्णयार्थ पाठविलेल्या दलित वस्तीतील विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली.शहर अभियंत्यांना कायम करण्याचा ठरावमहापालिकेतील बांधकाम विभागाचे प्रभारी शहर अभियंता ज्ञानेंद्र मेश्राम यांना पदस्थापनेवर कायम करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. मेश्राम यांना शहर अभियंतापदी कायम करण्यात यावे, असा ठराव यापुर्वी आमसभेत मंजूर करण्यात आला होता. पुन्हा मेश्राम यांना स्थायी समितीने न्याय देण्याची भूमिका बजावली आहे.शहर अभियंता हे पद शासन स्तरावरील असले तरी मागील काही वर्षांपासून ज्ञानेंद्र मेश्राम हे शहर अभियंता म्हणून प्रभार सांभाळत आहेत. मेश्राम हे महापालिकेच्या आस्थापनेवर असल्यामुळे त्यांना विकास कामांबाबत सहजतेने सांगता येईल. -विलास इंगोले,सभापती, स्थायी समिती