शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

अनुजाचे स्वप्न ‘इंटेरियर डिझाईनर’चे

By admin | Updated: June 7, 2016 00:01 IST

तीन वर्षांपूर्वी वडिलांचे अपघातात निधन झाले. तरीही नाऊमेद न होता अनुजा रवींद्र माकोडे हिने इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९८.६० टक्के गुण प्राप्त करुन जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे

अमरावती : तीन वर्षांपूर्वी वडिलांचे अपघातात निधन झाले. तरीही नाऊमेद न होता अनुजा रवींद्र माकोडे हिने इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९८.६० टक्के गुण प्राप्त करुन जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. अनुजा हिला ‘इंटेरिअर डिझायनर’ क्षेत्रात करिअर घडवायचे असल्याचे तिने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.अंजनगाव सूर्जी येथील सीताबाई संगई कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी अनुजा ही नाठे लेआऊटमधील सदानंदनगर येथील रहिवासी आहे. १२ वी पर्यंतचे शिक्षण हे विज्ञानमध्ये घ्यायचे असून पुढे फाईन आर्टकडे जायचे आहे. ‘इंटेरियर डिझायनर’ बनून करिअर घडविण्याचे स्वप्न असल्याचे तिने सांगितले. अभ्यासाचे नियोजन केल्यास यश नक्कीच मिळते अशी अनुजा म्हणाली. टी. व्ही. पाहण्यास हरकत नाही, परंतु वेळ ठरला पाहिजे. अभ्यासाच्या वेळेत अभ्यास हेच तंत्र वापरले पाहिजे. घरात आई, आजी, आजोबा व मोठी बहीण असून या सर्वाचे अभ्यासात मोठे पाठबळ मिळाले आहे. १० व्या वर्गात प्रवेश होताच खासगी शिकवणी लावण्यात आल्याचे अनुजा हिने सांगितले. करिअर घडविण्याचे ठरविले की ते कोणत्या क्षेत्रात घडवायचे हे अगोदर निश्चित केले तर घालमेल होती नाही, असे ती म्हणाली. मुंबई, औरंगाबाद किंवा नागपूर येथे जी -१ मध्ये प्रवेश मिळेल तसे ‘इंटेरियर डिझाईनर’ बनून करिअर घडवायचे आहे. डिझाईन, चित्रकला क्षेत्राची पूर्वीपासून रुची असून याच क्षेत्रात करिअर घडवेल, असे अनुजा हिचा मानस आहे. नियमित अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन हेच यशाचे गमक आहे. ती आपल्या यशाचे श्रेय आई आणि शिक्षकांना देते. जिल्ह्यात अव्वल आले असले तरी अनुजा हिला फाईन आर्ट अभ्यासक्रमाकडे जायचे आहे.