शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांच्या वाहतुकीस प्रमाणपत्र आवश्यक

By admin | Updated: January 6, 2016 00:20 IST

जनावरांच्या आठवडी बाजाराच्या दिवसी दूध उत्पादन क्षमता असणाऱ्या प्रजननक्षम अथवा शेती उपयोगी गोवंश व म्हैसवर्गीय जनावरांची वाहनातून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते.

पशुसंवर्धन विभागाची माहिती : कायद्याबाबत जागरुकता महत्त्वाचीअमरावती : जनावरांच्या आठवडी बाजाराच्या दिवसी दूध उत्पादन क्षमता असणाऱ्या प्रजननक्षम अथवा शेती उपयोगी गोवंश व म्हैसवर्गीय जनावरांची वाहनातून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. मात्र ही वाहतूक करताना प्राणी क्लेश प्रतिबंधक कायदा व जनावरांची वाहतूक नियम १९७८ व २००१ नुसार पशुवैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली.महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) कायद्यानुसार गोवंशीय जनावरांची कत्तल करणे, कत्तलीसाठी वाहतूक, निर्यात, खरेदी, विक्री, विल्हेवाट, गोवंशीय मांस ताब्यात ठेवणे, प्रतिबंध असताना सुद्धा असे अनेक प्रकारची प्रकरणे घडत असतात. महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियमाद्वारे कोणतीही व्यक्ती राज्यातील कोणत्याही गायीची हत्या करू शकत नाही. प्राणी कत्तलीस योग्य असल्याबाबत सक्षम प्राधिकरणाकडून लेखी प्रमाणपत्र आवश्यक आहे. महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ हा दिनांक ४ मार्च २०१५ पासून राज्यात लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार गाय, वळू किंवा बैल यांची कत्तल करण्यासाठी वाहतूक व निर्यात करता येणार नाही. कोणत्याही पद्धतीने खरेदी, विक्री करण्यास व विल्हेवाट लावण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. (प्रतिनिधी)कायद्यानुसार गोवंशीय जनावरांची कत्तल, कत्तलीसाठी वाहतूक, निर्यात, खरेदी-विक्री वा विल्हेवाट, मांस ताब्यात ठेवणे कायद्याने अपराध आहे. जनावरांच्या वाहतुकीसाठी सक्षम प्राधिकरणाचे प्रमाणपत्र हवे.- विजय रहाटे, सहआयुक्त कृषी संवर्धन.कायद्यात कडक तरतुदीराज्याबाहेर कत्तल केलेली गाय, वळू किंवा बैल यांचे मांस ताब्यात ठेवता येणार नाहीत. या अधिनियमातील सर्व अपराध दखलपात्र व विना जमानतीचे आहेत, गोवंशाची कत्तल केल्यास, कत्तलीसाठी वाहतूक, निर्यात केल्यास, कत्तलीसाठी खरेदी-विक्री केल्यास १० हजार रुपये दंड व ५ वर्षाचा कारावास अशी कायद्यात तरतूद आहे.गोमांस विक्रीवर कडक निर्बंधगोवंशाचे मांस ताब्यात ठेवल्यास, कलम सहाचे उल्लंघन केल्यास, दोन हजार रूपये दंड व एक वर्षे कारावास अशी शिक्षेची तरतूद आहे. उल्लंघन झाल्यास पोलीस उपनिरीक्षकापेक्षा कमी दर्जा नसलेल्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास कारवाई करण्याचा अधिकार कलम ८ नुसार प्रदान करण्यात आलेला आहे.