शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

- हा तर मराठ्यांचा अन्यायाविरूद्ध आक्रोश !

By admin | Updated: September 23, 2016 00:21 IST

मराठा समाज एकेकाळी सधन होता. परंतु सातत्याने होत असलेल्या अन्यायामुळे हा समाज माघारत गेला.

ना. प्रवीण पोटे : ११ लाख मराठ्यांचा सहभाग अमरावती : मराठा समाज एकेकाळी सधन होता. परंतु सातत्याने होत असलेल्या अन्यायामुळे हा समाज माघारत गेला. समाजाची सर्वच क्षेत्रात पिछेहाट होत गेली. मात्र, आता या अन्यायाने परिसीमा ओलांडली आहे. ६९ वर्षांनंतर मराठा समाज जागृत झाला असून या अन्यायाविरूद्धचा आक्रोशच या ‘न भूतो न भविष्यती’ मूकमोर्चातून उफाळून आला आहे. म्हणूनच शासनाने मराठा समाजाच्या मागण्या मंजूर कराव्यात, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.सकल मराठा समाजाच्यावतीने गुरूवारी काढण्यात आलेल्या मूकमोर्चाने आजवरच्या मोर्चांचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. समाजावर सातत्याने होत असलेल्या अन्यायला विरोध करण्याकरिताच हा समाज रस्त्यावर उतरल्याचा पुनरूच्चार यावेळी पालकमंत्र्यांनी केला. ते म्हणाले, कधीकाळी मराठा समाज भूपती होता. परंतु आज या समाजातील नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोपर्डीतील घटनेने या समाजाचा संयम पूर्णपणे ढळला. यातूनच समाज एकवटला आणि या अन्यायाच्या बिजांमधूनच मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी जन्मली आहे. हा मोर्चा शासन अथवा कोणत्याही समाजाविरूद्ध नाही, ही बाब पालकमंत्र्यांनी स्पष्ट केली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही प्रमुख मागणी आहे. त्याचप्रमाणे शेतमालाला योग्य भाव, मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शिष्यवृत्ती मिळावी या मागण्यांसाठी हा मूक आक्रोश आहे, असे ते म्हणाले. मोर्चेकऱ्यांच्या संख्येबाबत प्रशासनाकडून सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी कानोसा घेतला असता तब्बल साडेआठ लाख लोक अमरावतीत दाखल झाल्याची माहिती होती. मात्र, दुपारी २ वाजता ही संख्या ११ लाखांच्यावर पोहोचल्याचा दावा ना. पोटे यांनी केला. मोर्चा शिस्तबद्ध तितकाच लक्षणीय होता. मोर्चेकऱ्यांच्या मागणीनुसार अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याचा सूर आहे, ही बाब राज्य शासनाने मान्य करावी. सततची नापिकी, दुष्काळ आदी कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्या करणारे ९० टक्के शेतकरी हे मराठा समाजाचे आहेत, असे ते म्हणाले. शासनाचा प्रतिनिधी म्हणून या मोर्चाविषयी मुख्यमंत्र्यांना इत्यंभूत माहिती दिली जाईल. मराठा समाजाला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न असेल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. मराठा समाजाची शासनपूरक भूमिका असून हा मोर्चा कोणत्याही समाजाविरोधी नसल्याचे ना. पोेटे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. (प्रतिनिधी)