शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीच्या अनुदानात दीड लाखांची वाढ

By admin | Updated: June 5, 2014 23:41 IST

अंगणवाडीच्या इमारती बांधण्यासाठी देण्यात येणार्‍या अनुदानात शासनाने दीड लाख रूपयांची वाढ केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात अंगणवाडीच्या इमारतीच्या रखडलेल्या बांधकामाला आता गती मिळणार आहे.

अमरावती : अंगणवाडीच्या इमारती बांधण्यासाठी देण्यात येणार्‍या अनुदानात शासनाने दीड लाख रूपयांची वाढ केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात अंगणवाडीच्या इमारतीच्या रखडलेल्या बांधकामाला आता गती मिळणार आहे. लहान मुलांना बालवयातच शिक्षणाची गोडी लागावी यासाठी जिल्ह्यात एक हजाराहून अधिक अंगणवाड्या उभारण्यास मंजुरी देण्यात आली होती. यापैकी निम्म्यापेक्षा अधिक अंगणवाड्यांच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तर गेल्या काही महिन्यांपासून बर्‍याच अंगणवाड्यांना अद्यापही स्वत:च्या इमारती नाहीत. भाड्याच्या इमारतीमध्येच अंगणवाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी बांधकामासाठी लागणारे सिमेंट लोखंड विटा आदी साहित्यात मोठी वाढ झाली होती. मात्र वाढीव अनुदानामुळे ते शक्य होणार आहे.रखडलेल्या कामांना मिळणार गतीजिल्हा परिषद स्तरावर अंगणवाड्यांच्या इमारतीच्या बांधकामांना मान्यता दिली गेली तरीही ग्रामपंचायती मात्र बांधकाम परवडणारे नसल्याचे कारण देत होत्या त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर अंगणवाड्याचे बांधकाम रखडले होते. अनुदान वाढवून दिल्यामुळे रखडलेल्या कामाला गती मिळण्यास मदत होऊ शकते.दरम्यान अंगणवाडीचे रखडलेले बांधकाम पूर्ण करता यावे यासाठी राज्य शासनाने बांधकामासाठी साडेचार लाखाऐवजी सहा लाख रूपये देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे रखडलेली कामे पूर्ण होण्यास मदत होईल. याबाबत जिल्हा परिषदेला आदेश प्राप्त झाले आहेत. (प्रतिनिधी)