शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन थेट बँक खात्यात

By admin | Updated: February 16, 2017 00:13 IST

राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनिस यांचे मानधन आयुक्तालय स्तरावरून पीएफएमएस

‘पीएफएमएस’ प्रणाली : महिला, बालविकास विभागाचे निर्देश अमरावती : राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनिस यांचे मानधन आयुक्तालय स्तरावरून पीएफएमएस (पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम) या प्रणालीद्वारे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा होणार आहे. हीप्रणाली तातडीने कार्यान्वित करण्यात यावी, असे निर्देश महिला व बालविकास विभागाने दिले आहेत.आयुक्तालयस्तरावर राज्यातील सर्व प्रकल्पातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांची एकत्रित हजेरी व त्याद्वारे देयक तयार करण्यासाठी आवश्यक माहिती संकलित करण्यासाठी आयुक्तालयाने खासगीरित्या विकसित केलेल्या संगणक प्रणालीमध्ये माहिती तंत्रज्ञान विभागाने सुचविलेले बदल विचारात घेऊन त्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा तातडीने करण्यात याव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.आयुक्तालयाने विकसित केलेल्या संगणक प्रणालीमध्ये राज्यातील सर्व सेविका, मदतनिस यांची नावे, बँक खाते क्रमांक, आधार कार्ड क्रमांक, आहरण व सवितरण अधिकारी यांची माहिती अपलोड करण्यात यावी. मुंबई प्रकल्पातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे फेब्रुवारी २०१७ चे मानधन पीएफएमएस प्रणालीद्वारे त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात यावे. तसेच राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे मार्च २०१७ मधील मानधन प्रायोगिक तत्वावर त्यांच्या बँक खात्यात पीएफएमएस प्रणालीद्वारे थेट जमा करण्यात यावे. मात्र एप्रिल २०१७ पासून अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे मानधन पीएफएमएस प्रणालीद्वारेच अदा करण्यात येणार आहे. आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी संचालक, माहिती तंत्रज्ञान व संचालक लेखा व कोषागारे यांच्याशी समन्वय ठेऊन पीएफएमएस प्रणालीद्वारे मानधन अदा करण्यासाठी येणाऱ्या अडचणींचे निवारण करून घ्यावे. तथापि मार्च २०१७ अखेरपर्यंत सदर प्रणाली पूर्णपणे राज्यात कार्यान्वीत होईल याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही देण्यात आले आहे.राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे मानधन जिल्हास्तरावरून आहरित करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये कॅश मॅनेजमेंट प्रोजेक्ट प्रणालीद्वारे थेट जमा करण्यासाठी महिला व बालविकास विभागाने मान्यता देण्यात आली होती. आता केंद्र शासनाने अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे मानधन पीएफएमएस या प्रणालीद्वारे प्रदान करण्याबाबत सूचित केले आहे. आयुक्त एकात्मिक बालविकास सेवायोजना यांनी मानधनाची रक्कम आयुक्तालय स्तरावरून एकत्रित गोषवारा पद्धतीने आहरित करुन अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये पीएफएमएस (पब्लिक फायनांन्शियल मॅनेजमेंट सिस्टीम) या प्रणालीद्वारे थेट जमा करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. अंगणवाडी कर्मचारी यांचे मानधन वेळेत मिळण्यासाठी व मानधन वाटप कामकाजात पारदर्शकता राहण्यासाठी पीएफएमएस प्रणालीद्वारे मानधन प्रदान करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)