शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

अन् जंगल भ्रमंती न करताच परतल्या यशोमती!

By admin | Updated: December 4, 2015 00:37 IST

आमदारांसाठी तिकिटे हवीत, असे सांगून रांगेत लागलेल्या पर्यटकांना मागे सारून जंगल सफारी आरक्षण केंद्रावरून कार्यकर्त्याने तिकीट मिळविले.

नरेंद्र जावरे चिखलदराआमदारांसाठी तिकिटे हवीत, असे सांगून रांगेत लागलेल्या पर्यटकांना मागे सारून जंगल सफारी आरक्षण केंद्रावरून कार्यकर्त्याने तिकीट मिळविले. मात्र, यामुळे पर्यटकांमध्ये तीव्र पडसाद उमटले. ही बाब लक्षात येताच आमदारांनी क्षणाचाही विलंब न लावता आणलेली सर्व तिकिटे परत करून जंगल सफारीचा निर्णय रद्द केला. या कृतीमुळे तिवसा मतदारसंघाच्या आ. यशोमती ठाकूर यांनी एक आदर्श स्थापित केला आहे. विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळासह मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सेमाडोेह येथे जंगल सफारीसाठी पर्यटकांनी गर्दी केली होती. अशातच सुटीचे दिवस असल्याने पुढारी आणि अधिकाऱ्यांचे नातेवाईकसुद्धा मोठ्या प्रमाणात येतात. आ. यशोमतीदेखील त्यांच्या सहकाऱ्यांसह जंगल सफारीच्या उद्देशाने सेमाडोह येथे दाखल झाल्या.उपस्थित पर्यटक झाले अवाक् तिकीट कसे मिळविले हे आ.यशोमती ठाकूर यांना त्यांच्या कार्यकर्त्याने सांगितले. तेथे उपस्थित पर्यटकांचे नाराज चेहरे आणि त्यांचा रोषपूर्ण संवाद ऐकताच त्यांनी जंगल सफारीसाठी घेतलेली तिकिटे परत करण्याचे फर्मान सोडले. त्यांच्या या निर्णयाने उपस्थित पर्यटक अवाक् झालेत. कुणीतरी लगेच या कृतीसाठी त्यांचे कौतुकही केले. इतकेच नव्हे, तर आमदारांना नियमबाह्यरीत्या तिकिटे देणाऱ्या महिला वन कर्मचाऱ्यालासुध्दा आनंद झाला. आ. यशोमतींचा हा आदर्श सर्व लोकप्रतिनिधींनी घ्यावा, असाच आहे. जंगल सफारीचा कार्यक्रम रद्द झाल्याने आ. यशोमतींनी सोबतच्या पाहुण्यांना नजीकच्या रायपूर या खेड्यात नेऊन फिरवून आणले आणि त्यांना तेथील आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले. सेमाडोह परिसरात आमदारांच्या या कृतीची चर्चा बराच वेळ रंगली होती.