शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अन् शुक्रवारी डाळ बाजारात पोहोचली

By admin | Updated: October 22, 2016 00:06 IST

आठवडाभरापासून बाजारपेठेत डाळ उपलब्ध नसल्याने अचानक डाळीचे दर गगनाला भिडले होते.

‘कोल्डस्टोरेज’ सील : साठेबाजांच्या ‘महसूल’ने आवळल्या मुसक्या अमरावती : आठवडाभरापासून बाजारपेठेत डाळ उपलब्ध नसल्याने अचानक डाळीचे दर गगनाला भिडले होते. सामान्यांना डाळ खरेदी करणे शक्य नव्हते. मात्र डाळीची साठेबाजी रोखण्यासाठी महसूल विभागाने गुरूवारी रात्री अचानक ‘दालमिल’वर राबविलेल्या धाडसत्रानंतर शुक्रवारी बाजारपेठेत डाळीचा मुबलकसाठा पोहचला, हे विशेष.जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या आदेशानुसार ‘महसूल’च्या चमुने एमआयडीसीतील १२ तर दाभा व लोणी येथील दालमिलवर धाडसत्र राबविले. त्यानुसार ११ ठिकाणी परवान्यापेक्षा अधिक डाळीचा साठा असल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले. गुरूवारी रात्री तब्बल चार ते पाच तास चाललेल्या महसूलच्या ‘सर्चिंग आॅपरेशन’नंतर शुक्रवारी बाजारात डाळीचा साठा उपलब्ध झाल्याचे तहसीलदार सुरेश बगळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. एमआयडीसीतील विष्णू मालपाणी यांच्या मालकीच्या ‘उद्घव पल्सेस कोल्डस्टोरेज’मध्ये चक्क डाळ साठवून ठेवल्याचे पाहून दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी सुद्धा अवाक झालेत. धाडसत्रादरम्यान १४ दालमिलची तपासणी करताना तीन मिलला परवाने नसल्याची बाब निदर्शनास आली. परवानगीपेक्षा अधिक आढळलेल्या डाळीच्या साठ्याचे बाजारमूल्य तीन कोटींच्या घरात असल्याचे महसूल अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. तहसीलदार सुरेश बगळे यांनी साठेबाजांच्या कारवाईला मूर्त रुप दिले. दालमिलवरील धाडसत्रानंतर स्टॉक तपासला असता अधिक साठा आढळून आला. धाडसत्रादरम्यान पोलिसांचा बंदोबस्त अमरावती : १९२९.५ क्विंटल चनाडाळ जप्त केली. दालमिलच्या तपासणीसाठी जिल्हाधिकारी गित्ते स्वत: घटनास्थळी पोहोचले. साठेबाजांच्या मुसक्या आवळण्यासाठी जिल्ह्यातील महसूल विभागाच्या चमूला पाचारण केले होते. एमआयडीसीत एकाच वेळी चार ते पाच ठिकाणी दालमिलवर धाडसत्र राबविताना नेमके काय सुरू आहे, हे व्यापाऱ्यांना कळू शकले नाही. नायब तहसीलदार, अन्न व पुरवठा विभागाच्या निरीक्षकांनी पंचनामा करून डाळ ताब्यात घेतली. शुक्रवारी उशिरा डाळसाठ्याची मोजदाद सुरूच होती. गुरूवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास दालमिलवर धाडसत्र राबविले. ‘आॅपरेशन साठेबाजी’साठी पाच तहसीलदार मैदानातऐन सणासुदीच्या तोंडावर डाळीची साठेबाजी करण्याची व्यापाऱ्यांनी लढविलेली शक्कल हाणून पाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार चार तहसीलदार मैदानात उतरले होते. सुरेश बगळे, वैष्णव वाहुरवाघ, राम लंके मनोज डोणारकर, पुरूषोत्तम भुसारी या पाच तहसीलदारांनी ‘आॅपरेशन साठेबाजी’ ही मोहीम फत्ते केली. त्यांच्या मदतीला जिल्हा अन्न व पुरवठा अधिकारी देवराव वानखडे, केशव मळसने, धीरज मांजरे, प्रशांत अडचुले, मंडळ अधिकारी संजय ढोक, वाय.एम. चतूर, मधुकर धुळे, डी.जी. गावनेर, प्रवीण वैद्य, तलाठी धर्माळे, भूषण डहाके, संतोष चपटे आदी होते.दालमिलचे २०० पेक्षा अधिक परवाने?अमरावती जिल्ह्याची लोकसंख्या बघता दालमिलचे परवाने हे २०० पेक्षा अधिक असल्याची माहिती तहसीलदार सुरेश बगळे यांनी दिली. अन्न व पुरवठा विभागाने कोणत्या आधारावर ही परवानगी दिली, याचा कसून शोध घेतला जाईल. आवश्यकतेक्षा जास्त डाळी तयार करणाऱ्या मिलला परवानगी कशी देण्यात आली, याचा शोधही महसूल विभागाद्वारे घेतला जाणार आहे. साठेबाजी करणाऱ्यांवर कायदेशिर कारवाई केली जाईल. यात कोणाचाही मुलाहिजा केला जाणार नाही. तीन कोटी बाजारमूल्याचा डाळीचा साठा जप्त करण्यात आला आहे.- किरण गित्ते, जिल्हाधिकारी, अमरावती.