शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

अंबानगरीवर ‘अमृत’ वर्षाव

By admin | Updated: April 4, 2016 00:44 IST

केंद्र सरकारच्या ‘अमृत’ योजनेंतर्गत शहरातील प्रत्येक घरात ‘नळगंगा’ पोहोचणार आहे. दर उन्हाळ्यात मजीप्रावर

अमरावती : केंद्र सरकारच्या ‘अमृत’ योजनेंतर्गत शहरातील प्रत्येक घरात ‘नळगंगा’ पोहोचणार आहे. दर उन्हाळ्यात मजीप्रावर येणारा अतिरिक्त ताण या योजनेच्या कार्यान्वयनामुळे हलका होणार आहे. पहिल्या टप्प्यात ९५ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर २१ मार्च रोजी पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील कामांच्या एकत्रित प्रस्तावाला तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. १२२.५७ कोटी रुपयांमधून अमरावती पाणी पुरवठा योजना साकारणार आहे. तांत्रिक मंजुरी मिळाल्याने मे अथवा जूनमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणे अपेक्षित आहे. पाणी वितरण व्यवस्था चोख बजावण्यासाठी कोट्यवधीचा निधी मंजूर करून अमरावतीकर ‘अमृत’ वर्षाव होणार असला तरी योजना कार्यान्वित झाल्यानंतर प्रत्येक घरात नळजोडणी देणे बंधनकारक राहणार आहे. पाणीपट्टी वसुली अधिक प्रमाणात होऊन ही योजना योग्यप्रकारे चालविता यावी, हा यामागचा उद्देश आहे. अमरावती, अचलपूरसह ५१ शहरांमध्ये ‘अटल मिशन फॉर रिज्युव्हनेशन अ‍ॅन्ड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन’ अर्थात ‘अमृत’ या महत्त्वाकांक्षी अभियानाची राज्यात अंमलबजावणी होत आहे. शहरातील प्रत्येक घरासाठी प्रचलित निकषानुसार पाणी पुरवठा, सार्वजनिक स्वच्छतेसाठी मलनि:स्सारण, मलव्यवस्थापन व पर्जन्य जलवाहिनीची व्यवस्था तसेच इतर सुविधांची निर्मिती आदी उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी ‘अमृत’ अभियान राज्यात राबविले जात आहे. अमरावती महापालिकेला अमृत योजनेतील पाणी पुरवठा योजनेसाठी १२२ कोटी रुपये मंजूर झालेत. कोट्यवधीचे काम महापालिका करणार की मजीप्रा? याबाबत संभ्रम कायम आहे. महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार हे अमृत योजनेतील कोट्यवधीचे काम महापालिका यंत्रणेकडून करवून घेण्यास इच्छुक आहेत. (प्रतिनिधी)या कामांचा समावेश४सर्व्हे वर्कसाठी ३१ लाख, रॉ-पम्पिंग मशिनरीसाठी १९५.९३ लाख, प्युअर वॉटर पंपिंग मशिनरीसाठी ४४.१० लाख, फ्लोमीटर ३३.६४ लाख, व्हॅल्यू अ‍ॅक्च्यूअ‍ॅटर १४४.८८ लाख, वॉटर टँक १०९५.७९ लाख तथा सोलरसाठी ११३३ लाख रुपये खर्च करण्यास मंजुरी मिळाली आहे. पाण्याच्या वितरण व्यवस्थेसाठी यात ६० कोटींची तरतूद आहे. एकत्रित प्रस्तावाला मान्यता४अमृत कार्यक्रमांतर्गत अमरावती पाणी पुरवठा योजनेस यापूर्वी तांत्रिक मंजुरी देण्यात आली होती. दरम्यान याच प्रस्तावात टप्पा २ अंतर्गत प्रस्तावित कामांचा समावेश करावा, असे निर्देश राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या बैठकीत देण्यात आलेत. त्यानंतर अमरावती पाणी पुरवठा योजना टप्पा क्र. १ व २ चा एकत्रित प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावाला मजीप्राचे मुख्य अभियंता ग.के.गोखले यांनी मंजुरी दिली. ११.३३ कोटीतून साकारणार सौर ऊर्जा प्रकल्प४सुमारे ११.३३ कोटी रुपयांमधून २ मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा या कामात समावेश आहे. हा प्रकल्प तपोवन जलशुद्धीकरण केंद्राजवळ उभारण्यात येईल. याशिवाय आठ साठवण टाक्या व जुनी वितरण व्यवस्था बदलण्यासह नवीन वितरण व्यवस्थेसाठी सुमारे ६० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. नवीन जलशुद्धीकरण केंद्रासह शहरात २५१ किलोमीटर लांबीची वितरिका प्रस्तावित असून २६०.६१ किमीची वितरिका बदलायची आहे. थर्ड पार्टी निरीक्षण आवश्यकसर्व कामांसाठी लागणारे पीव्हीसी, एचडीपीई, सीआय व डीआय पाईप, स्लूस व्हॉल्व्ह या साहित्याची मजीप्रामार्फत मान्यताप्राप्त एजन्सीकडून ‘थर्ड पार्टी निरीक्षण’ करून प्रमाणपत्र घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. ७ लाखांच्या शहरात ८२ हजार ग्राहक४सुमारे ७ लाख लोकसंख्येच्या शहरात महाराष्ट्र जीवन प्राधीकरणचे ८१ हजार ४११ निवासी ग्राहक आहेत. याशिवाय १००४ सार्वजनिक नळ मजीप्राच्या ग्राहक कक्षेत येतात तर ७१९ संस्था कार्यालयांना मजीप्रा पाणी पुरवठा करते. तुर्तास अमरावती शहर व बडनेरा शहराला दररोज ९५ दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. शहरातील १६ जलकुंभातून शहरवासियांना पाणी पुरवठा होतो. योजनेतील अटी व शर्ती ४योजनेच्या कामांचा समावेश कालबद्ध प्रगती अहवालात करण्यात यावा, योजनेवर मंजूर किमतीपेक्षा अधिक खर्च करू नये, प्रत्येक उपांगाचा वेळोवेळी घेण्यात येणाऱ्या काँक्रीट ठोकळ्यांच्या चाचणीचे अहवाल ‘अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून किंवा अधिकृत यंत्रणेकडून करून घेणे अनिवार्य राहील. वितरण व्यवस्थेमध्ये स्टँडपोस्ट लावण्यात येऊ नये. तसेच योजना कार्यान्वित झाल्यानंतर प्रत्येक घरात नळजोडणी देणे बंधनकारक करावे, जेणेकरून पाणीपट्टी वसुली अधिक प्रमाणात होऊन योजना योग्य प्रकारे चालविता येईल.