शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीकरांचा ‘स्मार्ट’ अपेक्षाभंग

By admin | Updated: September 26, 2016 00:17 IST

बहुप्रतिक्षित ‘स्मार्ट सिटी’स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीचा निकाल काल- परवा लागला आणि सात लाख

स्मार्ट सिटीचे दिवास्वप्नच : आता केवळ प्रतीक्षाअमरावती : बहुप्रतिक्षित ‘स्मार्ट सिटी’स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीचा निकाल काल- परवा लागला आणि सात लाख अमरावतीकरांचा हिरमोड झाला. स्मार्ट सिटीच्या स्वप्नावर यामुळे विरजण पडले.नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू स्मार्ट शहरांची नावे घोषित करीत असताना अमरावतीकर प्राण कंठाशी आणून अमरावतीच्या नावाची प्रतीक्षा करीत होते. अमरावतीचा उल्लेख आता होईल. मग होईल..याची प्रतीक्षा करीत होते. मात्र, २७ शहरांची यादी जाहीर झाली आणि त्यात अमरावतीचा उल्लेख झालाच नाही. क्षणात अमरावतीकरांचा अपेक्षाभंग झाला. पुन्हा एकदा अमरावतीकरांच्या पदरी घोर निराशा आली. अमरावती महापालिका ‘स्मार्ट सिटी’तून बाद झाले. आता उरली आहे ती केवळ प्रतीक्षा. नव्याने प्रस्ताव दाखल करण्याच्या कालावधीची प्रतीक्षा करण्याशिवाय तूर्तास पर्याय नाही.अमरावतीचा नंबर का हुकला? अमरावती : राज्यातील पाच शहरांची ‘स्मार्ट सिटी’त निवड होत असताना आपण कुठे कमी पडलो याचे मंथन करण्यापलिकडे आता दुसरा ‘स्मार्ट’ पर्याय अमरावतीकरांजवळ व महापालिका यंत्रणेकडेही नाही. तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार आणि विद्यमान आयुक्त हेमंत पवार या दुकलीने प्रयत्नांची पराकाष्ठा केली खरी; मात्र यश आले नाही. अमरावतीचा नंबर का हुकला? याची कारणमीमांसा मात्र व्हायलाच हवी.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील १०० स्मार्ट सिटीच्या उपक्रमात अमरावती महापालिकेचा समावेश झाला व अमरावतीकरांच्या आनंदाला धुमारे फुटले. पहिल्या फेरीतच अमरावतीचा समावेश निश्चित व्हावा, यासाठी तब्बल ५,५०० कोटी रुपयांचा डीपीआर केंद्राला पाठविण्यात आला. मात्र, ‘ग्रीनफिल्ड’ संकल्पनेचा पहिल्या फेरीत समावेश झाला नाही. अमरावती महापालिकेने पाठविलेला ‘ग्रीनफिल्ड’ प्रस्ताव नाकारण्यात आला. त्यानंतर ‘फास्ट ट्रॅक’मध्येही अमरावती महापालिकेचा समावेश होऊ शकला नाही. त्यानंतर दुसऱ्या फेरीसाठी नव्याने २२६८ कोटी रूपयांचा प्रस्ताव ३० जूनला रवाना करण्यात आला. दुसऱ्यांदा निश्चितपणे यश मिळेल, याआशेने सर्वसमावेशक प्रस्ताव पाठविल्याचा दावा यंत्रणेकडून करण्यात आला. मात्र, दुसऱ्या प्रयत्नातही अमरावती महापालिका स्मार्ट सिटी स्पर्धेत टिकाव धरू शकली नाही. आतापर्यंत १०० पैकी ६० शहरांची स्मार्ट सिटी प्रकल्पांत निवड झाली आहे. पहिली फेरी, फास्ट टॅ्रक आणि तिसऱ्या फेरीत अमरावती शहराची निवड न झाल्याने आता पुन्हा एकदा अमरावतीला ४० शहरांसोबत स्मार्ट स्पर्धेला सामोरे जावे लागेल. स्मार्ट सिटी, त्या अनुषंगाने होणारी गुंतवणूक आणि भविष्यकालीन विकासाला तूर्तास तरी ब्रेक लागला आहे. (प्रतिनिधी)