शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

फिल्ड क्राफ्ट डेमो, स्वच्छ गट स्पर्धेत अमरावती एसआरपीएफ अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:13 IST

देशमुख साहेबांनी पान १ साठी दिली आहे. बल गट क्रमांक ९, राज्य राखीव पोलीस दलाचा ७३ वा वर्धापन दिन, ...

देशमुख साहेबांनी पान १ साठी दिली आहे.

बल गट क्रमांक ९, राज्य राखीव पोलीस दलाचा ७३ वा वर्धापन दिन, आदर्श अधिकारीही

फोटो - संजय माटे यांच्याकडे आहेत.

अमरावती : राज्य राखीव पोलीस दलाच्या स्थानिक बल गट क्रमांक ९ च्या जवानांनी ७३ व्या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने आयोजित विविध स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावली आहेत. वैयक्तिक स्पर्धेत आदर्श पोलीस निरीक्षक व आदर्श कूक या गटांतील पुरस्कार अमरावतीच्या खात्याला गेले. फिल्ड क्राफ्ट डेमो, स्वच्छ गट स्पर्धेत अमरावती एसआरपीएफ अव्वल ठरले.

देशांतर्गत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ६ मार्च १९४८ रोजी स्थापन करण्यात आलेल्या राज्य राखीव पोलीस बलाचा ७३ वा वर्धापन दिन राज्यातील सर्व दलांमध्ये साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त नानवीज येथील प्रशिक्षण केंद्रात स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. यात पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षकांमधून आदर्श पोलीस अधिकारी, राज्यस्तरीय स्वच्छ गट, फिल्ड क्राफ्ट डेमो, आयुधिक शाखा व आदर्श कूक स्पर्धा यांचा समावेश होता. स्पर्धेत सहभागाची तयारी नोव्हेंबर २०२० पासून समादेशक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली होती.

अमरावती स्थित राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ९ यांनी गट स्वच्छता ट्रॉफी पटकावली. पोलीस निरीक्षक गटात राजेंद्र अंबादास राऊत हे आदर्श अधिकारी ठरले. आयुधिक शाखा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून ट्रॉफी पटकावली. फिल्ड क्राफ्ट डेमो स्पर्धेत नागपूर परिक्षेत्रातून प्रथम व राज्य राखीव पोलीस बलाममधील सर्व गटांमधून द्वितीय पुरस्कार मिळविला. आदर्श कूक स्पर्धेत माणिक लांडे यांनी द्वितीय पारितोषिकावर नाव कोरले.

--------------

दिनदर्शिकेत स्थान

वर्धापन दिनानिमित्त राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी दिनदर्शिका प्रकाशित केली. सदर दिनदर्शिकेमध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी सर्व छायाचित्रे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ९, अमरावती येथील आहेत.

-------------

अप्पर पोलीस महासंचालक व उफमहानिरीक्षक यांच्या मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभले. त्यामुळे संपूर्ण चमूने चमकदार कामगिरी केली आहे. महिला दिनानिमित्त कर्मचाऱ्यांच्या पत्नीच्या स्वावलंबनासाठी आम्ही ‘उडान’ हा उपक्रम सुरू करीत आहोत.

- हर्ष पोद्दार, समादेशक, एसआरपीएफ बल गट क्र. ९ (फोटो)