शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती एक्स्प्रेसला दरदिवशी सहा लाखांचे उत्पन्न

By admin | Updated: April 20, 2015 00:23 IST

अमरावतीकरांच्या मनात वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या अमरावती-मुंबई एक्स्प्रेस गाडीला चार डबे वाढविण्याचा प्रस्ताव अद्यापही धूळ खात पडला आहे.

डबेवाढीचा प्रस्ताव बारगळला : प्रवास करणाऱ्यांची गर्दी वाढलीअमरावती : अमरावतीकरांच्या मनात वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या अमरावती-मुंबई एक्स्प्रेस गाडीला चार डबे वाढविण्याचा प्रस्ताव अद्यापही धूळ खात पडला आहे. दरदिवसाला सहा लाखांचे उत्पन्न देणाऱ्या या गाडीच्या सोयीसुविधांकडे लोकप्रतिनिधींनी कमालीचे दुर्लक्ष चालविले आहे.७ सप्टेंबर २००८ पासून सुरु झालेली मुंबई एक्सप्रेस आजतायगत हाऊसफुल्ल धावत आहे. विशेषत: उन्हाळ्यात प्रतीक्षा यादीचे आरक्षण घेऊन या गाडीने प्रवास करणाऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे उन्हाळ्यात दुप्पट रक्कम देणारी ही गाडी ठरत असल्याची नोंद रेल्वे विभागात आहे. प्रवाशांची गर्दी बघता मुंबई एक्स्प्रेसच्या डब्यांमध्ये वाढ करावी, याबाबतचा प्रस्ताव खा. आनंदराव अडसूळ यांनी रेल्वेकडे दिला होता. परंतु या प्रस्तावावर रेल्वेने गांभीर्याने विचार केला नसल्याने वास्तव आहे. हल्ली ही गाडी १८ डब्यांची धावत असून याशिवाय चार डब्यांची अतिरिक्त मागणी फारपूर्वीची आहे. विदर्भ एक्स्प्रेसपेक्षाही मुंबई एक्स्प्रेसला जास्त मागणी असताना डब्यांमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव का धूळ खात पडला आहे, हा संशोधनाचा विषय आहे. दरवर्षी उन्हाळा अथवा लग्न प्रसंगाचा मौसम सुरु झाला की मुंबई एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. सातत्त्याने डब्यांमध्ये वाढ करण्याची मागणी सुरु असून लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. दुसरीकडे प्लॅटफार्मवर अपुऱ्या सुविधांमुळे नवीन गाड्या सुरु करणे किंवा अस्तित्वात असलेल्या गाड्यांच्या डब्यात वाढ करणे शक्य नाही, हीदेखील नवीन माहिती हाती आली आहे.