शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने फसवणुकीचे अमरावती 'कनेक्शन'

By admin | Updated: January 29, 2015 22:59 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे खोटी कागदपत्रे ग्रामपंचायतींना दाखवून अस्तित्वात नसलेल्या योजनेच्या नावावर विमा पॉलिसी काढणाऱ्या प्रकरणातील सूत्रधार अमरावतीचा राजेश पडोळे

अमरावती : जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे खोटी कागदपत्रे ग्रामपंचायतींना दाखवून अस्तित्वात नसलेल्या योजनेच्या नावावर विमा पॉलिसी काढणाऱ्या प्रकरणातील सूत्रधार अमरावतीचा राजेश पडोळे असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. शासकीय कर्मचारी भासवून त्याने अनेक ग्रामपंचायतींना विश्वासात घेऊन हजारो नागरिकांना गंडा घातला आहे. तिवसा ठाण्यात अटकेत असलेल्या दोन आरोपींना ३१ जानेवरीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. शंभर रुपयांत एक लाखाचा विमा असे आमिष दाखवून भांबोरा, अमदाबाद, पालवाडी या गावांतील कित्येक नागरिकांना राजीव गांधी ग्राम विमा योजना व जीवणदायी ग्राम विमा योजनेच्या नावाने फसवणूक करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे अर्ज, विमा पॉलिसीच्या पावतीवर शासनाची राजमुद्रा व पावती फाडणारा ग्रामपंचायत कर्मचारी असल्याने या नागरिकांची फसगत झाली. भांबोरा व पालवाडी येथील व्यक्ती मृत झाल्यावर त्यांना विमा पॉलिसीचा लाभ मिळावा, अशी मागणी नागरिकांनी केल्यावर सरपंच, सचिवांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मृतांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठल्यावर ही योजनाच अस्तित्वात नाही व ही कागदपत्रे व स्वाक्षरी जिल्हाधिकाऱ्यांची नाही, असे समजल्यानंतर नातेवार्इंकानी तिवसा ठाण्यात तक्रार दाखल केली. तिवसा पोलिसांनी राजेश गवळी (अमरावती) व भांबोरा ग्रामपंचायत कर्मचारी गणेश गवळी यांना अटक केली. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार राजेश गवळी असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. शासनाच्या राजमुद्रेचा वापर करून फसवणुकीचे प्रकार हल्ली वाढले आहेत. मागील महिन्यात शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाची असणाऱ्या सुकन्या योजनेमध्ये 'प्रतिनिधी पाहिजेत' या आशयाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. केवळ एसएमएसद्वारे नाव व पत्ता मागवून त्या उमेदवाराला स्पिड पोस्टद्वारे शासनाचे राजमुद्रा अंकित असलेल्या पत्रावर नियुक्तीपत्र पाठविण्यात आले व सातत्याने संपर्क करून योजनेच्या प्रशिक्षणासाठी ६ हजार रुपये दर्शविलेल्या बँक खात्यात जमा करण्याबद्दल फोन आलेत. अनेक नागरिकांनी शासनाच्या राजमुद्रेवर विश्वास ठेवून रक्कमेचा बँक खात्यात भरणा केला. मात्र, तो नंबर कधीच लागला नाही.