शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘आपले सरकार’ पोर्टलवर सर्व सेवांचे एकत्रीकरण

By admin | Updated: July 14, 2017 00:42 IST

राज्याचा सेवा हमी कायदा क्रांतिकारक आहे. नागरिकांना शासकीय सेवा विहित कालमयार्देत देण्यासाठी या कायद्याची निर्मिती करण्यात आली आहे.

स्वाधीन क्षत्रिय : लोकसेवा हक्क आयोगाची कार्यशाळालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्याचा सेवा हमी कायदा क्रांतिकारक आहे. नागरिकांना शासकीय सेवा विहित कालमयार्देत देण्यासाठी या कायद्याची निर्मिती करण्यात आली आहे. कायद्यामुळे नागरिकांना सेवा मिळविण्यासोबतच त्यांचे सक्षमीकरणही होणार असल्याने राज्यात कायद्याची प्रभावी अमंलबजावणी व्हावी, साठी सर्व शासकीय यंत्रणांनी व्यापक जनजागृती करावी, असे आवाहन राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी केले.विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात गुरूवारी विभागस्तरीय लोकसेवा हक्क आयोग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल, त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर विभागीय आयुक्त पीयूष सिंह, विशेष पोलीस महानिरीक्षक सी.एच.वाकडे, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार, महाआॅनलाईनचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद कोलते, उपसचिव संजय काटकर उपस्थित होते. राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर ‘आपले सरकार’ आणि महाआॅनलाईन यासारखे सेवा देणारे पोर्टल उपलब्ध आहे. पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात येणारी सेवा अधिसूचित केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य शासनाच्या सेवा आपले सरकार या वेबपोर्टलच्या माध्यमातून एका प्लॅटफार्मवर आणण्यात येणार आहे. त्यामुळे कायद्याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करावी लागेल, असे ते म्हणाले.नागरिकांच्या सुविधेसाठी आरटीएस महाराष्ट्र नावाचे मोबाईल अ‍ॅप उपलब्ध करण्यात आले आहे. अधिकारी किंवा कर्मचारी यांनी कोणत्याही प्रकारे माहिती देण्यासाठी विलंब केल्यास कारवाई आणि दंड ठोठावण्यात येणार आहे. नायब तहसीलदार निकिता जावरकर यांनी संचालन, तर पुरवठा उपायुक्त रमेश मावस्कर यांनी आभार मानले.