शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

उरणच्या पार्श्वभूमिवर शहरात ‘अलर्ट’

By admin | Updated: September 25, 2016 00:24 IST

मुंबईतील उरण परिसरात चार बंदुकधारी व्यक्ती शिरल्याची माहिती मिळताच राज्यभरात अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सणोत्सव : 'त्या' बंदुकधारींचे स्केच जारी, पथक सज्ज अमरावती : मुंबईतील उरण परिसरात चार बंदुकधारी व्यक्ती शिरल्याची माहिती मिळताच राज्यभरात अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने तसेच आगामी नवरात्री उत्सवाच्या दृष्टीने शहर पोलीसही सतर्क झाले आहेत. बॉम्बशोधक व नाशक पथकाद्वारे विविध गर्दीच्या ठिकाणाची तपासणी सुरू केली. शनिवारी पथकाद्वारे बडनेरा रेल्वे स्थानकावरील प्रवाशांजवळील बॅगांची तपासणी केली. देशाच्या सीमेवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर नवी मुंबईत तीन दिवसांपूर्वी चार शस्त्रधारी व्यक्ती शिरल्याचे काही विद्यार्थींना दिसले. त्याअनुषंगाने पोलिसांनी स्केच जारी केले आहे. अद्यापपर्यंत त्या अज्ञात व्यक्तींचा शोध लागलेला नाही. ते शस्त्रधारी व्यक्ती मुंबईतून कोणत्या दिशेने गेलेत, याविषयी निश्चीतता नसल्यामुळे राज्यभरात अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.त्याअनुषंगाने शहर पोलीसही सतर्क झाले आहे. पोलीस विभागाकडून शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी तपासणी सुरू झाली असून गस्त वाढविण्यात आली आहे. रेल्वे स्थानक, बसस्थानक, मोठे मंदिरे तसेच अन्य गर्दीच्या ठिकाणी पोलिसांनी वॉच ठेवलेला आहे. शुक्रवारी अंबादेवी व एकविरा देवी मंदिर परिसराची पाहणी करण्यात आली असून मंदिर व्यवस्थापकांशी सुरक्षेसंबंधितांनी चर्चा केली. शनिवारी बॉम्बशोधक व नाशक पथकाचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनात पथकातील जवान व श्वान पथकाने बडनेरा, अमरावती रेल्वे स्थानक, बसस्थानक, अंबादेवी व वॉलमार्ट परिसराची तपासणी केली. शहरात कोठेही संशयित वस्तू किंवा बॅग आढळल्यास तत्काळ पोलीस विभागाशी संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.