शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या दिवशीही आढळल्या दारुच्या बाटल्या

By admin | Updated: November 7, 2016 00:15 IST

जलसंपदा व पाटबंधारे विभागाच्या कार्यालय परिसरात नेहमीच ओल्या पार्ट्या करण्यात येत असल्याचे आता सिध्द झाले आहे.

परिस्थिती जैेसे थे : झाडाचा फांद्या टाकून लपविण्याचा प्रयत्न अमरावती : जलसंपदा व पाटबंधारे विभागाच्या कार्यालय परिसरात नेहमीच ओल्या पार्ट्या करण्यात येत असल्याचे आता सिध्द झाले आहे. रविवारी दुसऱ्या दिवशीही जलसंपदा विभागाच्या परिसरात दारुच्या बाटल्या आढळल्याने या प्रकरणाची कर्मचाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. रविवारी या भागात पुन्हा स्टिंग केले असता शनिवारी ज्या उर्ध्व वर्धा पाटबंधारे व मालमत्ता उपविभागाच्या इमारतीच्या मागच्या बाजूला शौचालयाच्याजवळ या बॉटल्स आढळल्या होत्या, त्या बाटल्या उचलण्याऐवजी झाडाचा तोडलेल्या फांद्या टाकून पडदा पाडला. हा प्रकार येथे घडलाच नसल्याचे दाखविण्यात आले होते. पण येथे दारुच्या बॉटल्स जैसे थे पडून होत्या. त्यामुळे येथे नियमित मद्यपी या परिसरात मद्यपान करतात व ओल्या पार्ट्या झोडल्यानंतर परिसरातच रिकाम्या बॉटल्स, सोड्याची बाटली व डिस्पोजल ग्लास या ठिकाणी फेकून देतात. सर्व नियम धाब्यावर बसवून सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्याचा जणू काही गोरखधंदाच थाटला आहे. रविवारी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयाच्या बाजूला सुध्दा ज्या ठिकाणी वाहनांच्या स्टँड आहे. त्या ठिकाणी इमारतीला लागून असलेल्या खुल्या जागेत विविध प्रकारच्या ब्रँडच्या दारुच्या रिकाम्या बाटल्या आढळल्या बाजूलाच एक खड्डा आहे. या खड्ड्यातही अनेक बॉटल्स टाकण्यात आला होत्या. त्या बॉटल्स कुणाला दिसून नये, यासाठी झाडाचा खाली पडलेला पाला - पाचोळा त्या बाटल्यांवर टाकण्यात आला होता. हा गोरखधंदा मागील अनेक वर्षांपासून सुरू असल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर दबक्या आवाजात येथील रहिवासी असलेल्या कर्मचाऱ्यांनी बोलवून दाखविले. आपण वर्षभरापूर्वी आले असते तर हा प्रकार आधीच थांबविता आला असता, अशी कैफियतही त्या कर्मचाऱ्याने 'लोकमत'जवळ व्यक्त केली. बाजूलाच जलसंपदा विभागाचे विश्रामगृह आहे. या विश्रामगृहात तर ओेल्या पार्ट्या करण्यात येत नाहीत ना ? अशी चर्चा आहे. 'लोकमत'ने हा प्रकार शनिवारी उजेडात आणला. या प्रकरणाची दखल येथील दोन्ही मुख्य अभियंता यांनी अद्यापही घेतली नाही. येथे पाटबंधारे विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. या ठिकाणी नियमित चौकीदार नसल्यामुळे या परिसरात कुणाचेही लक्ष राहत नाही. नेमका याच संधीचा फायदा हे मद्यपी घेतात. परिसरात दारू ढोसून खुलेआम दारुच्या पिऊन रिकाम्या बॉटल्स राजोरसपणे तेथेच फेकून देतात. त्यामुळे कार्यालयाच्या शिस्तीवर नागरिकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे. (प्रतिनिधी)या भागात पोलिसांनी गस्त वाढवावी पाटबंधारे विभागाच्या कार्यालया जवळच कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. येथे शेकडो कुटुंब राहतात. या ठिकाणी मद्यपी खुलेआम दारु पिऊन या परिसरातच दारुच्या बॉटल्स फेकून देतात. येथे बाहेरील तरुणांचाही वावर असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या वसाहतीतील नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी रात्री या परिसरारात पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी आहे.