शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कृषी सिंचन योजनेचा २० हजार शेतकऱ्यांना फटका

By admin | Updated: October 9, 2016 01:08 IST

अमरावती प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी उपलब्धता व्हावे,

सर्व्हर डाऊन : आॅनलाईनची मुदत संपलीमोहन राऊत अमरावतीप्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी उपलब्धता व्हावे, याकरिता आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. मात्र सर्व्हर डाऊन व मुदत संपल्याने जिल्ह्यातील २० हजार शेतकऱ्यांना अर्ज भरता आले नाही. याचा सर्वाधिक फटका धामणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे़ शेती हा व्यवसाय अधिक फायदेशीर व्हावा, शेतकऱ्यांची जोखीम कमी व्हावी, तसेच आधुनिक कृषी तंत्राला प्रोत्साहन मिळणे, सरंक्षित सिंचन व्यवस्थेसाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना सुरू केली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्रात वाढ करणे, जलवापर कार्यक्षमतेत वाढ करणे, कुशल व अकुशल बेरोजगारांसाठी रोजगाराची संधी निर्माण करणे, असे या योजनेचे उद्दिष्ट होते़शेतकरी वंचित : शासनाने सर्वच पिकांकरिता ही योजना सुरू केल्यामुळे योजनेंतर्गत आपली ई-नोंदणी व्हावी, यासाठी अनेक शेतकऱ्यांनी आठ दिवसांपासून सातबारा, बँक पासबुकची सत्यप्रत घेऊन सायबर कॅफीकडे रिंघ लावली. मात्र सर्व्हर डाऊन असल्यामुळे या शेतकऱ्यांना घराकडे परतावे लागले़एकीकडे दररोज सायबर कॅफीमागे चकरा मारल्याने आर्थिक नुकसान झाले, तर दुसरीकडे या योजनेची मुदत संपल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहेत़ जिल्ह्यातील २० हजार शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले असल्याची माहिती पुढे आली आहे़पाच तालुक्यांना फटकाअवर्षणप्रवण क्षेत्रातील अल्प व अत्यल्प भूधारक ६० टक्के, अवर्षणप्रवण क्षेत्रातील सर्वसाधारण भूधारक ४५ टक्के, अवर्षणप्रवण क्षेत्राबाहेरील अल्प व अत्यल्प भूधारक ४५ टक्के, अवर्षणप्रवण क्षेत्राबाहेरील सर्वसाधारण भूधारक ३५ टक्के अशी अनुदानाची मर्यादा या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत होती़ अवर्षणप्रवण क्षेत्रात जिल्ह्यातील अमरावती, चिखलदरा, धामणगाव रेल्वे, वरूड, अंजनगाव सुर्जी या पाच तालुक्यांचा समावेश होता़ एक महिन्यात तब्बल १७ दिवस या तालुक्यातील सर्व्हर डाऊन राहत असल्याने मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे़इतर जिल्ह्यांत वाढली मुदतशासनाने ७ सप्टेंबर ते ६ आॅक्टोबर असे एक महिना राज्यात कृषी सिचंन योजना राबवून ई-अर्ज मागिविले होते़ गुरुवारी एक महिना पूर्ण झाल्यानंतर नागपूर, चंद्रपूर, रायगड, भंडारा या जिल्ह्यातील योजनेला मुदतवाढ दिली आहे़ मात्र त्यातून अमरावती जिल्हा वगळला असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे़कृषी सिचंन योजनेअंतर्गत ई-अर्ज एक महिना मागविण्यात आले होते़ अनेक तालुक्यातील अर्ज या वेबसाईटवर प्राप्त झाले आहे़ गुरूवारपासून ई-अर्ज प्रक्रिया जिल्ह्यासाठी बंद करण्यात आली आहे़ - दत्तात्रय मुळे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अमरावतीमागील आठ दिवसांपासून चकरा मारून आपली ई-नोंदणी झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा या योजनेची नोंदणी सुरू करून आम्हा शेतकऱ्यांना न्याय द्यावा़- प्रवीण भोगेशेतकरी, धामणगाव रेल्वे