शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

तीन महिन्यांनंतर अधिसूचनेला लाभला मुहूर्त

By admin | Updated: July 24, 2016 00:05 IST

शहरातील वाढती वाहनाची संख्या व अपघाताचे वाढते प्रमाण बघता वाहतुकीसंदर्भात नियोजन करणे अत्यावश्यक होते.

अधिसूचना जाहीर : सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत जड वाहतुकीस बंदीअमरावती : शहरातील वाढती वाहनाची संख्या व अपघाताचे वाढते प्रमाण बघता वाहतुकीसंदर्भात नियोजन करणे अत्यावश्यक होते. मात्र, या नियोजन प्रक्रियेला विविध कारणास्तव विलंब झाला आहे. तब्बल तीन महिन्यांनंतर वाहतूक नियोजनाला मुहूर्त मिळाला आहे. पोलीस विभागातर्फे वाहतूक नियोजनासंदर्भात शुक्रवारी अंतिम अधिसूचना जारी करण्यात आली. यामध्ये जड वाहनांना सकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत वाहतुकीस बंदी घातली आहे. यादरम्यान ठराविक वेळेत वाहनांना प्रवेश घेण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. शहरात २०११ ते २०१५ या कालावधीत २ हजार ६२३ अपघात घडले. त्यामध्ये ३७१ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व सुरक्षित रहावी, या उद्देशाने २७ एप्रिल रोजी प्रस्तावित अधिसूचना जारी करण्यात आली होती. त्यानुसार आक्षेप व सूचना प्राप्त झाल्यानंतर ११ व १८ जुलै रोजी नागरिक, लोकप्रतिनीधी व ट्रकमालक संघटना, आरटीओ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. नियोजनातून अधिसुचना जारी करण्यात आली. या मार्गावर जड वाहतूकीला बंदीअमरावती : यामध्ये शहरात येणाऱ्या जड वाहतुकीला प्रतिबंध घालण्यात आला आहे. मात्र, काही मार्गाने वेळेच बंधन ठेवून वाहतूक करण्यास सूट देण्यात आली आहे. गिट्टी, बोल्डर, रेती, मुरुम, मलबा, डांबरची वाहतूक करणाऱ्या वाहनांना सकाळी ८ ते १०, दुपारी २ ते ४.३० व ६.३० वाजता या वेळेदरम्यान जुना बायपासचा वापर करता येईल. परंतु गांधी चौक ते रविनगर, गांधी चौक ते राजापेठ, गांधी चौक ते अंबागेट मार्ग, बजरंग टेकडी ते विलास नगर, पटवा चौक या मार्गावर वाहतूक करण्यास प्रतिबंध राहणार आहे. (प्रतिनिधी)अंतर्गत रस्त्यांवर वाहन उभे करता येणार नाहीशहरातील अंतर्गत मार्गावर सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत जड व हलके वाहन उभे करता येणार नाही. यामध्ये ४०७, ७०९, गिट्टी-बोल्डर टॅक, रेती ट्रक या वाहनांना बंदी राहणार आहे. २० ते ३० किमी. गतीची मर्यादाशहरात वाहतूक करणाऱ्या सर्व जड वाहनांना २० ते ३० किमि. गतीची क्षमता ठेवता येणार आहे. ज्या वाहनांना मालाची चढउतार करण्याची आवश्यकता नाही, अशा जड वाहनांना २४ तास प्रवेश बंदी राहणार आहे. त्यांना केवळ सुपर एक्सप्रेस व रींगरोडचा वापर करता येईल. वाहतूक करण्यास प्रतिबंधित मार्गशहरात सर्व जड व हलकी मालवाहू वाहनांना सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रवेश बंदी राहणार आहे. तसेच सर्व जड वाहनांना जुना बायपास येथून वाहतूकीस प्रतिबंध लावण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तुंच्या वाहतुकीला वेळेचे बंधन शहरातून जीवनावश्यक अतिमहत्त्वाच्या वस्तुंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना वेळेचे बंधन घालून वाहतुकीसस सूट देण्यात आली आहे. त्यामध्ये बडनेराकडून जुन्या बायपासने येणाऱ्या जड वाहनांना एमआयडीसीपर्यंत येता येईल. सकाळी ८ ते १०, दुपारी २ ते ४.३० व ६.३० वाजतानंतरच्या वेळेत वाहनांना एमआयडीसी कार्यालयापर्यंत येता येईल. तेथून शहरात जाण्यासाठी प्रतिबंध राहील. एमआयडीसी कार्यालय ते आशियाना चौकपर्यंत सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रतिबंध राहील. मालधक्का बडनेरा येथून वाहतूक करणाऱ्या जडवाहनांनी बगिया टी पाईंट येथूत सुपर एक्सपे्रस हायवेवर जाऊन गौरी इन-रहाटगाव मार्गाचा अवलंब करावा लागेल. बडनेराकडून सातुर्णा एमआयडीसीकडे येणाऱ्या जड वाहनांना सकाळी ८ ते १०, दुपारी २ ते ४.३० व ६.३० वाजता या वेळेत येता येईल.सुरळीत, सुरक्षित वाहतुकीसाठी अधिसूचना काढली असून २५ जुलैपासून अमलात येईल. या अधिसूचनेचे उल्लंघन केल्यास मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. - मोरेश्वर आत्राम, पोलीस उपायुक्त.