शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्राणघातक हल्ल्यानंतर अचलपूरच्या नगरसेवकाला अटकपूर्व जामीन

By admin | Updated: May 4, 2016 00:39 IST

अमित बटाऊवाले हत्याकांडात सध्या कारागृहात असलेला बारुद गँगचा म्होरक्या व नगरसेवक मो.शाकीरवर पाच वर्षांपूर्वी एकावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे

अटकपूर्व जामीन : अटकेबाबत नागरिकांमध्ये संशयअचलपूर : अमित बटाऊवाले हत्याकांडात सध्या कारागृहात असलेला बारुद गँगचा म्होरक्या व नगरसेवक मो.शाकीरवर पाच वर्षांपूर्वी एकावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे. त्याने तब्बल पाच वर्षांनंतर उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन घेतला. दरम्यानच्या काळात तो अचलपुरात फिरत होता. एवढेच नव्हे तर मो.शाकीरने अचलपूर नगर पालिकेची निवडणूक लढवून नगरसेवक बनल्यानंतर त्याची जंगी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत पोलीस बंदोबस्तही होता. तरीही पोलिसांनी त्याला अटक का केली नाही, असा प्रश्न पडला आहे. मागील सात ते आठ वर्षांपूर्वी विद्यार्थिनींच्या छेडखानीचे प्रमाण वाढले होते. त्याचा बंदोबस्त करण्याच्या नावाखाली अचलपूर, परतवाडा शहरातील काही युवक एकत्र येऊन वाघाई देवीच्या नावाची संघटना काढण्यात आली होती. संघटनेचे कुठलेही लेखी रेकॉर्ड नव्हते या संघटनेतील काही सदस्यांचे राजकीय शत्रुत्वही होते. यातील एक सदस्य मोहन ठाकूर होता. याचेशी मो.शाकीर वाद झाला होता. हा वाद विकोपाला गेला २९ एप्रिल २००७ रोजी काही कामानिमित्त मोहन ठाकूर एकटे उपजिल्हा रुग्णालयात आले होते. ही संधी साधून बारुद गँगच्या सदस्यांनी त्यांचेवर प्राणघातक हल्ला केला होता. यात ठाकूर गंभीर जखमी होऊन त्यांच्या पायांना अपंगत्व आले होते या हल्ल्यातील प्रमुख हल्लेखोर मो.शाकीर, मो.गुलहसन होता. या अचलपूर पोलीस ठाण्याला गु.र.नं.३३/०७ भादवी ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. हा हल्ला झाल्यापासून तब्बल ५ वर्षे २ महीे २७ दिवसानंतर २६ जून २०१३ रोजी मो.शाकीर याने उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन घेतला होता.हल्ल्यानंतर तो पोलिसांच्या लेखी फरार असला तरी तो शहरात बिनधास्त फिरत असे एवढेच नव्हे तर नोव्हेंबर २०११ रोजी झालेली नगर परिषदेची निवडणूक त्याने लढवली. आपला प्रतिस्पर्धी साजीद फुलारी याचा पराजय करुन तो नगरसेवक बनला, त्याची चावलमंडीतून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत पोलीसही होते.प्राणघातक हल्ल्यासारख्या गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या मो. शाकीरला पोलिसांनी तब्बल पाच वर्षे अटक का केली नाही, पोलिसांवर राजकीय दबाव होता, पोलीस त्याला घाबरत होते की, पोलिसांचे काही हितसंबंध होते, असा संशय आता निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)