शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अखेर गुडेवार परतले

By admin | Updated: June 4, 2016 23:59 IST

अवघ्या १३ महिन्यांच्या कार्यकाळानंतर राजकीय बळी ठरलेले तत्कालीन महापालिका आयुक्त चंद्रकात गुडेवार अमरावतीत परतले आहेत.

सुखद धक्का : ‘डीआरडीए’त प्रकल्प संचालकअमरावती : अवघ्या १३ महिन्यांच्या कार्यकाळानंतर राजकीय बळी ठरलेले तत्कालीन महापालिका आयुक्त चंद्रकात गुडेवार अमरावतीत परतले आहेत. राज्य शासनाने त्यांची अमरावती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक म्हणून पदस्थापना केली आहे. ‘डीआरडीए’चे प्रकल्प संचालक म्हणून गुडेवार सोमवारी पदभार स्वीकारणार असल्याचे संकेत आहेत. गत १६ मे रोजी गुडेवार यांची अमरावती महानगरपालिका आुयक्तपदावरून बदली झाली होती. त्यांना ग्रामविकास व जलसंधारण विभाग या मूळ विभागात मंत्रालयात पाठविण्यात आले होते. १५ दिवस त्यांची कुठल्याही पदावर नियुक्ती झालेली नव्हती. दरम्यान शनिवार ४ जून रोजी ग्रामविकास विभागाने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संवर्गातील चंद्रकांत गुडेवार यांची प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा अमरावती या रिक्त पदावर पदस्थापना केली. सदर पदाचा पदभार त्वरित स्वीकारावा, अशा सूचनाही शासन निर्देशातून देण्यात आल्या आहेत. के. एम. अहमद यांची वाशिमला बदली झाल्यानंतर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ‘डीआरडीए’च्या प्रकल्प संचालकाचा तात्पुरता प्रभार दिलीप मानकर यांच्याकडे देण्यात आला होता. सोमवारी मानकर यांच्याकडून गुडेवार नियमित प्रकल्प संचालक म्हणून कार्यकार स्वीकारतील, अशी माहिती आहे. ‘तो’ काळ गाजवला २ जून २००६ ते २ आॅगस्ट २००८ या सव्वा दोनवर्षाच्या कालावधीत चंद्रकांत गुडेवार अमरावतीच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक होते. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील एका बड्या नेत्याच्या संस्थेतील आर्थिक अनियमितता उघड केली होती. ‘डिआरडीए’ त्यावेळी गुडेवारांच्या कर्तव्यशुचितेने गाजले. ८ वर्षाचा प्रदीर्घ कालावधीनंतर गुुडेवार पुन्हा ‘डीआरडीए’ परतले आहे. अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून त्यांचा अल्पसा कार्यकाळ ‘डेयरडॅशिंग’ असाच राहिला.