ठिय्या आंदोलन : खुल्या निविदाव्दारे होणार शिलाई मशीन खरेदी अमरावती : जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत जिल्हा परिषदेच्या स्व उत्पन्नातून ग्रामीण भागातील महिलांना रोजगार मिळावा यासाठी शिलाई मशीन, सायकली १०० टक्के अनुदानावर दिल्या जातात . या साहित्याचा पुरवठा करण्यासाठी खरेदी ही शासन दरानुसार ३० जूनपर्यंत संबंधित विभागामार्फत करण्यात न आल्याने जिल्हा परिषदेची शिलाई मशीन थंडबस्त्यात पडली होती. दरम्यान या मुद्यावर बुधवारी जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण समिती सभापती अर्चना मुरूमकर यांच्या नेतृत्वात महिला सदस्यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या कक्षात ठिय्या दिला.जिल्हा परिषद महिला बाल कल्याण विभागाला जिल्हा निधीतून मिळालेल्या सुमारे ६४ लाख रुपयांच्या अनुदानातून सन २०१३-१४ मध्ये ३२ लाख ५० हजारांची शिलाई मशीन व सायकली खरेदी करणे ३० जूनपर्यंत शासन दरपत्रकानुसार आवश्यक होते. परंतु प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे ही शिलाई मशीन खरेदी ३० जूनपर्यंत पूर्ण करण्यात आलेली नाही. परिणामी शासन दरपत्रकानुसार पुरवठा करणारी शासन स्तरावरील खरेदीबाबतची मुदतही संपूण गेली. तरीही प्रशासनाने शिलाई मशीन खरेदीची निविदा वेळेत न काढल्यामुळे शिलाई मशीनची खरेदी रखडली. याबाबत महिला सदस्यांनी यापुर्वी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतली. शासन दरपत्रकाची मुदत संपल्यामुळे या प्रकारला प्रशासन दोषी आहे. यामुळे ग्रामीण भागातील महिलांना निवडणुकीच्या आचार संहितेपूर्वीीच शिलाई मशीन पुरवठा करावा. यासाठी खुल्या निविदा काढण्याची मागणी सभागृहात रेटून धरली होती. मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी खुल्या पध्दतीने निविदा काढता येणार नसल्याचा पावित्रा घेतला.
आंदोलनापुढे नमले प्रशासन
By admin | Updated: August 6, 2014 23:34 IST