शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनात्मक गुंतवणूक केल्यास हमखास फायदा- गुरुराज

By admin | Updated: June 23, 2016 00:13 IST

कष्टाने कमावलेल्या पैशाला योग्य मोबदला मिळाला तरच त्याचा उपयोग होतो.

इन्व्हेस्टमेंट सूत्र : अमरावतीकरांनी घेतले योग्य गुंतवणुकीचे धडेअमरावती : कष्टाने कमावलेल्या पैशाला योग्य मोबदला मिळाला तरच त्याचा उपयोग होतो. त्यामुळे बँका, वित्तीय संस्था आदी ठिकाणी सजगतेने पैसा गुंतवून त्या पैशाने पैसा वाढविता आला पाहिजे. हाच शहापणा जीवनात तुम्हाला तुमची सर्व स्वप्न पूर्ण करण्यास मदत करतो, असे प्रतिपादन बिर्ला सनलाइफ म्युच्युअलचे सहायक उपाध्यक्ष एस. गुरुराज यांनी केले. हॉटेल ग्रॅण्ड मैफील इन, कॅम्प रोड, अमरावती येथे बिर्ला सनलाइफ म्युच्युअल फंड आणि 'लोकमत' यांच्यावतीने आयोजित 'इन्व्हेस्टमेंट सूत्र' या कार्यक्रमात गुरुराज बोलत होते. ते पुढे म्हणाले की, जीवनात पैशाला खूप महत्त्व आहे. रोजचा खर्च, आजारपण, मुलांचे शिक्षण, लग्न, नवृत्तीनंतरचे जीवन या सर्वांचा विचार करून आपला पैसा बचत खाते, म्युच्युअल फंड, शेअर मार्केट अशा सर्व ठिकाणी अभ्यास करून गुंतवावा. आपला सर्व पैसा एकाच ठिकाणी, एकाच प्रकारात गुंतवू नये, असा सल्लाही गुरुराज यांनी यावेळी दिला. प्रारंभी बिर्ला सनलाइफ म्युच्युअलचे रिजनल हेड प्रशांत गुप्ता यांचे स्वागत लोकमत अमरावतीचे उपमहाव्यवस्थापक सुशांत दांडगे यांनी एस. गुरुराज यांचे स्वागत गणेश देशमुख, संपादकीय प्रमुख यांनी पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून आ.रवि राणा यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. प्रशांत गुप्ता यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, की पुस्तक, नियतकालिक, प्रसार माध्यमे आदींद्वारे मिळणाऱ्या आर्थिक गुंतवणुकीच्या माहितीची कमी नाही. पण, आपण ती सर्व माहिती समजून घेतली पाहिजे. आपला पैसा हा स्थावर मालमत्ता, बँक, इक्विटी फंड आणि इतर प्रकारांमध्ये गुंतवला पाहिजे. पैसा बँकेत किंवा घरात आळशी माणसासारखा पडून राहता कामा नये. तो देखील कार्यरत राहिला पाहिजे. त्या पैशानेही आणखी पैसे कमावले पाहिजे. तरच त्या पैशाला आणि पयार्याने आपल्या जीवनाला खरे मूल्य प्राप्त होते, असेही गुप्ता यांनी सांगितले. याप्रसंगी गुंतवणुकी संदर्भातल्या काही व्हिडिओ क्लिप्स दाखविण्यात आल्या. उपस्थितांच्या गुंतवणुकीसंदर्भातील शंकांचे निरसन मान्यवरांनी केले. अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमास गुंतवणूक तज्ज्ञ, सल्लागार व स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.गुंतवणूक टिप्सप्रत्येकाने म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे. म्युच्युअल फंड ही नियमांनी व विश्वासार्हतेने चालणारी संस्था आहे. घरबसल्यादेखील आपण त्यात गुंतवणूक करू शकतो.म्युच्युअल फंडातून आपण केव्हाही पैसा काढू शकतो. एटीएम कार्डद्वारे पैसे काढण्यासाठी जी कमाल मर्यादा असते, तेवढेच पैसे बचत खात्यात ठेवावेत. उरलेला पैसा इतर ठिकाणी गुंतवून त्याला क्रियाशील ठेवावे.प्रथम गुंतवणुकीच्या गरजा निश्चित केल्या पाहिजेत. म्हणजे गरजांना साजेशा योजनेची निवड करता येते. हिच गुंतवणूक आपल्याला भविष्यात कामी येत असल्याने गंतवणूक करताना कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता सजगतेने निर्णय घ्यावा.