शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापकांचे समायोजन वांद्यात

By admin | Updated: December 24, 2015 00:14 IST

शिक्षण हक्क कायदा २००९ नुसार जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त ठरलेल्या मुख्याध्यापकांचे समायोजन नियोजनाअभावी कोलमडले.

जिल्हा परिषद : ३१ डिसेंबरपर्यंत प्रक्रियेला मुदत अमरावती : शिक्षण हक्क कायदा २००९ नुसार जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त ठरलेल्या मुख्याध्यापकांचे समायोजन नियोजनाअभावी कोलमडले. दस्तुर खुद्द शिक्षण सभापतींनीच प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी केलेल्या नियोजनावर आक्षेप घेतला आहे. ३१ डिसेंबरपर्यंत २८३ मुख्याध्यापकांचे समायोजन जिल्हा व तालुका स्तरावर करावयाचे आहे. शिक्षण विभागाने समायोजनासाठी १०० ऐवजी १५० पेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या शाळांची निवड केली आहे. प्रत्यक्षात मुख्याध्यापकांचे समायोजन शंभर ही पटसंख्या गृहीत धरून करावयाचे ठरले होते. मात्र शिक्षण विभागाने शासन निर्णयाला फाटा देत नियोजनाचा बागूलबुवा केल्याने मुख्याध्यापकांचे समायोजन वांद्यात आले आहे. उल्लेखनीय म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ५ आॅक्टोबरच्या आदेशानुसार ही प्रक्रिया ३१ डिसेंबर पर्यंत पूर्ण करावयाचे आहे. मात्र शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांचे समायोजनाची प्रक्रिया करताना चुकीचे निकष लावल्याने हा गोंधळ झाल्याचे सभापतींनी सांगितले. त्यामुळे समायोजनाची प्रक्रिया विहित मुदतीत होणार किंवा नाही याबाबत शंका व्यस्त केली आहे. शासनाच्या २८ आॅगस्ट २०१५ च्या निर्णयानुसार सध्या अतित्विात असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या १०० पेक्षा कमी झाल्यास मुख्याध्यापकांचे पद अनुज्ञेय राहणार नाही. मात्र ज्या ठिकाणी १ती ७ पर्यंतची पटसंख्या ही शंभर असेल अशा शाळांमध्ये मुख्याध्यापकांचे पद कायम राहणार असल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे. मात्र जिल्हा परिषद शिक्षण विभागाने ३० सप्टेंबरच्या पटनिर्धानानुसार सन २०१५-१६ या वर्षाच्या संचमान्यतेनुसार पात्र मुख्याध्यापकांचे समायोजन करताना १५० पटसंख्येनुसार नियोजन केले होते. त्यामुळे सोमवारी शिक्षक संघटना व शिक्षण सभापती आणि शिक्षणाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. यामध्ये २८३ मुख्याध्यापकांचे समायोजन होणार होते ते कसे चुकीचे आहे, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शासनाच्याच नियमाप्रमाणे १ ते ७ पर्यंत संयुक्त शाळा आहेत आणि या शाळांची पटसंख्या ही शंभर आहे. अशा शाळेवर मुख्याध्यापकाचे पद कायम राहणार असल्याने या समायोजना शिवाय नवीन जवळपास १२५ शिक्षकांना मुख्याध्यापकांची संधी मिळणार असल्याचे शिक्षण सभापतींना गिरीश कराळे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.शिक्षणाधिकाऱ्यांनी शासन निर्णय विचारात न घेता मुख्याध्यापकांचे समायेजन करण्यात आले. मात्र १ ते ७ पर्यंत संयुक्त शाळेची पटसंख्या ही शंभर असल्यास अशा शाळांवर मुख्याध्यापकांचे पद कायम राहणार आहे ? मात्र याचा विचार न करताच समायोजन प्रक्रिया केली. याला शिक्षणाधिकारीच जबाबदार आहेत. त्यामुळे न्यायालयाचे आदेशानुसार ३१ डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया होणार किंवा नाही याची मलाच शंकाच आहे.- गिरीश कराळे, शिक्षण व बांधकाम सभापती जिल्हा परिषदसमायोजनची प्रक्रिया ही १३ डिसेंबर २०१३ च्या शासन निर्णयाप्रमाणे मुख्याध्यापकांचे समायोजनासाठी संचमान्यतेचे नियोजन करण्यात आले होते. मात्र अशातच २८ आॅगस्टच्या शासन निर्णयात याबाबत नवीन मागदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे यात काही उणिवा राहिली यात आता सुधारणा करून याबाबत उपसंचालक यांच्याकडे प्रस्ताव पाठविला आहे. याला मान्यता मिळताच प्रक्रिया राबवू.- एस.एम. पानझाडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद.