शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रशासनाची वारी, घरकुल मंजुरीसाठी लाभार्थींच्या दारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:12 IST

अमरावती : महाआवास अभियान ग्रामीण-२०२० च्या अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या नेतृत्वात ग्रामीण भागात ‘प्रशासनाची ...

अमरावती : महाआवास अभियान ग्रामीण-२०२० च्या अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या नेतृत्वात ग्रामीण भागात ‘प्रशासनाची वारी, घरकुल मंजुरीसाठी लाभार्थींच्या दारी’ मोहीम राबविली जात आहे.

राज्यात १९ नोव्हेंबर २०२० पासून महाआवास अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्याकरिता सन २०१६-१७ ते २०२०-२१ पर्यत एकूण ९२७३१ एवढे लक्ष्यांकापैकी ६४५४४ घरकुल लाभार्थींना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे, तर २८१८७ लाभार्थींना मंजुरी देणे बाकी आहे. मंजुरी बाकी असलेल्या लाभार्थींच्या प्रत्यक्ष गावात भेटी घेणे, घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी त्यांचे समुपदेशन करणे, गावातील उपलब्ध शासकीय जागेची माहिती घेणे आदींसाठी पंचायत समिती मधील कर्मचाऱ्यांकडून घरकुुलदूत म्हणून एक दिवस सक्षम लाभार्थींची भेट घेऊन घरकुल मंजुरीकरिता प्रवृत्त करण्यासाठी ‘प्रशासनाची वारी, घरकुल मंजुरीसाठी लाभार्थींच्या दारी’ ही विशेष मोहीम ग्रामीण भागात राबविली जात आहे. घरकुल मंजुरीसाठी लाभार्थ्याला येत असलेल्या अडचणींवर तोडगा काढणे तसेच जागा उपलब्ध नसलेल्या भूमिहीन लाभार्थींसाठी उपलब्ध असलेल्या पर्यायामध्ये बक्षीसपत्राद्वारे, अतिक्रमण नियमाकुल करणे, ई-क्लास, एफ-क्लास जागा, पंडित दीनदयाल उपाध्याय जागा खरेदी योजना आदी पर्यायांपैकी कुठल्याही पर्यायाद्वारे जागा उपलब्ध करणे शक्य आहे. याची पडताळणी या मोहिमेत करून यावर आठवडाभरात ग्रामपंचायतीकडून नियोजन घेणे हा उपक्रम घरकुल लाभार्थींसाठी राबविण्यात येत आहे.

बॉक्स

विहित नमुन्यात नोंदवा माहिती

घरकुलदूत म्हणून सहभागी झालेल्या संबंधित कर्मचाऱ्यांनी विस्तृत माहिती सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत