शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाणी व्यवस्थापनाच्या निधीवर प्रशासनाची चुप्पी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:10 IST

अमरावती : जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व पाणी व स्वच्छता विभाग आणि रोजगार हमी योजना या तीन विभागाच्या ...

अमरावती : जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व पाणी व स्वच्छता विभाग आणि रोजगार हमी योजना या तीन विभागाच्या माध्यमातून जिल्हाभरातील ५१ ग्रामपंचायतींमध्ये सांडपाणी व्यवस्थापनाची प्रक्रिया राबवायची आहे. मात्र या विषयावर प्रशासकीय यंत्रणेत चुप्पी साधली जात आहे. परिणामी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने उपलब्ध करून दिलेला ९२ लाखांचा पहिला हप्त्याचा निधी अखर्चितरित्या पडून आहे. या दोन्ही विभागात समन्वय साधण्यासाठी प्रशासनाला मुहूर्त सापडत नसल्याने कामेही रखडली असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

पाणीपुरवठा व स्वच्छता, ग्रामीण पाणीपुरवठा आणि रोजगार हमी योजना या तीन विभागातील समन्वयातून सांडपाणी व्यवस्थापनाच्या ५१ ग्रामपंचायतींमध्ये करावयाच्या कामांसाठी नियोजन करून या कामासाठी निविदा करणे आवश्यक आहे. परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी निधीचाही विनियोग होत नाही. सांडपाणी व्यवस्थापनाची प्रक्रिया केवळ प्रशासनातील लालफीतशाहीत अडकली आहे.

बॉक्स

५१ ग्रामपंचायतींत प्रकल्प

ग्रामपंचायत समृद्ध करण्यासाठी जागतिक बँक साहाय्यता निधीतून जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींची सांडपाणी व्यवस्थापनासाठी निवड करण्यात आली आहे. या निधीतून सांडपाणी तसेच घनकचरा व्यवस्थापनाची कामे करावयाची आहेत. हा प्रकल्प स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) रोजगार हमी योजना आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या तीन विभागाच्या समन्वयातून पूर्ण करावयाचा आहे. त्यातही स्वच्छ भारत मिशन कडून ९२ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र कामाची निविदा प्रक्रियेची जबाबदारी असलेल्या पाणीपुरवठा विभागाकडून यावर कारवाई होत नसल्याने लाखो रुपयांचा निधी केवळ समन्वयाअभावी पडून आहे. याकडे यंत्रणेचे पूर्णत: दुर्लक्ष आहे.