शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

‘एडीफाय’ फ्रेंचायसी नियमबाह्यच !

By admin | Updated: June 21, 2016 00:09 IST

स्थानिक कठोरास्थित देवी एज्युकेशन सोसायटीची एडीफाय फ्रेंचायसी नियमाबाह्यच असल्याचा अहवाल तपास ...

फौजदारीचे संकेत : ‘ईओ’चा ‘सीएमओ’ला अहवालअमरावती : स्थानिक कठोरास्थित देवी एज्युकेशन सोसायटीची एडीफाय फ्रेंचायसी नियमाबाह्यच असल्याचा अहवाल तपास अधिकारी तथा प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविला आहे. देवी एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित एडीफाय नियमांचे उल्लंघन करीत असल्याचेही शिक्षणाधिकाऱ्यांनी अहवालात नमूद केले आहे. या संस्थेवर कारवाई करण्याबाबतचा प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. बालक-पालक संघाचे रवि पाटील व अन्य पालकांनी एडीफायच्या नियमाबाह्यतेबाबत थेट मुख्यमंत्र्यांकडेच तक्रार केल्याने वेगाने सूत्र हलली आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये चौकशी करण्यात आली. हा संपूर्ण चौकशी अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाला सोमवारी पाठविण्यात आला आहे. देवी एज्युकेशन सोसायटीने एडीफाय फ्रेंचाईसीच्या नावावर कुठलीही परवानगी आणि मान्यता नसताना प्रवेश करवून घेतले. त्यासाठी संबंधितांकडून रक्कमही घेण्यात आली. हा सर्व प्रकार नियमांचे उल्लंघन करणारा व गंभीर आहे. कुठलीही शाळा खासगी कंपनीशी करारनामा करू शकत नाही. शिक्षण हक्क कायद्याचा तो भंग आहे; तथापि या सोसायटीने शिक्षण हक्क कायद्याचा भंग केला असून केलेले प्रवेशही नियमबाह्य आहेत, असा शेरा शिक्षणाधिकाऱ्यांकडून मारण्यात आला आहे. कोणतीही फ्रेंचाईसी घेऊन शाळा चालविता येणार नाही, असे आपण देवी एज्युकेशनला कळविल्याचे सीएमओला पाठविलेल्या अहवालात म्हटले आहे. (प्रतिनिधी)फौजदारीची तलवारदेवी एज्युकेशन सोसायटीने कुठलीही परवानगी व मान्यता नसताना केलेले प्रवेश अवैध ठरविले गेल्याने या सोसायटीवर फौजदारी कारवाईची टांगती तलवार आहे. मुख्यमंत्री कार्यालय आता कुठली कारवाई करते, याकडे शैक्षणिक वर्तुळातसह पालकांचे लक्ष लागले आहे. शासनाच्या परवानगी- मान्यता प्रमाणपत्राशिवाय अनधिकृतपणे सुरू असलेल्या शाळांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या सूचना आहेत. या सूचना डावलून देवी एज्युकेशन सोसायटीने प्रवेशाचा गोरखधंदा चालविल्याने शिक्षणाधिकाऱ्यांच्या अहवालानुसार त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई प्रस्तावित होण्याचे संकेत मिळाले आहे. यासंबंधीचा अहवाल मला प्राप्त झालेला नाही. माझ्यासाठी ही माहिती नवीन आहे. अहवाल मिळाल्याशिवाय याविषयावर मी कुठलेही भाष्य करू इच्छित नाही. - पूरण हबलानी, सर्वेसर्वा, देवी शिक्षण संस्था.देवी शिक्षण संस्थेने मान्यता नसताना दिलेले प्रवेश अवैध ठरतात. खासगी कंपनीशी करारनामा करणे हीसुध्दा गंभीर बाब असल्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविला आहे. - श्रीराम पानझाडे, शिक्षणाधिकारी