शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

ॲक्टिव्ह रुग्ण पहिल्यांदाच सात हजार क्राॅस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:13 IST

अमरावती : कोरोना संसर्गाचे ११ महिन्यांच्या कालावधीत ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या पहिल्यांदा उच्चांकी सात हजार क्राॅस झालेली असल्याचे रुग्णालये आणि ...

अमरावती : कोरोना संसर्गाचे ११ महिन्यांच्या कालावधीत ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या पहिल्यांदा उच्चांकी सात हजार क्राॅस झालेली असल्याचे रुग्णालये आणि बेडची संख्या वाढविण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनासमोर आहे. यापूर्वी सप्टेंबर २०२० चे ब्लास्टमध्ये सर्वाधिक ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ४,१०० होती. यावेळेस होम आयसोलेशनच्या सुविधेने प्रशासनाला दिलासा आहे.

जिल्ह्यात फेब्रुवारीपासून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. या महिनाभरात १४ हजार रुग्णांची नोंद झालेली आहे. कोरोनाच्या या उद्रेकामुळे रोज उच्चांकी रुग्णांची नोंद असल्यामुळे ॲक्टव्ह रुग्णांची संख्यादेखील दिवसेनगणिक वाढतच असल्याने आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडत आहे. यापूर्वी ११नोव्हेंबरच्या पत्रान्वये राज्याचे आरोग्य संचालकांनी जानेवारी पश्चात कोरोनाची दुसरी लाट येण्याचा अलर्ट दिला होता. व चाचण्यांच्या संख्येसह बेडच्या संख्येतही वाढ करण्याचे निदेर्शित केले होते. याकडे जिल्ह्यात दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे नियोजन करताना जिल्हा प्रशासनाची कसरत होत आहे.

सुपर स्प्रेडर्स यांच्या १०० टक्के चाचण्या करण्याचे उद्दिष्ट जिल्ह्याला देण्यात आले होते. त्या दृष्टीने चाचण्या होत आहे. मात्र, या प्रक्रियेला थोडा उशीरच झालेला आहे. सारी, ईलीचे आजाराचे सर्वेक्षण तसेच इंफ्लुएंझासदृश रुग्णांचा साप्ताहिक अहवालाद्वारे ट्रेंड समजून घेणे महत्त्वाचे आहे.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कॉन्टक्ट ट्रेसिंग प्रति रुग्णामागे किमान २० चे लक्ष्यांक दिलेले असताना एकाही दिवशी पूर्ण झालेले नाही. सद्यस्थितीत जिल्ह्याचा १० चा रेसो जिल्ह्या सुरू असल्याचे आरोग्य यंत्रणा सांगत असली तरी यामध्ये तथ्य नाही. चाचण्यांची रोजची संख्या व त्याच दिवशी नोंद होणारे कोरोना रुग्णांची संख्या पाहता जिल्ह्यात आता कॉन्टक्ट ट्रेसिंगच होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

बॉक्स

असे आहेत निर्देश

रुग्णसंख्या वाढत असतांना पॅझिटिव्हिटी ७ टक्क्यांवर कमी असल्यास ५ ते ७ समर्पित कोरोना रुग्णालये तयार ठेवावीत. ७ ते १० टक्के असल्यास असल्यास मेडिकल कॉलेजसह शहरी प्रभाग व तालुकास्तरावर एक रुग्णालय, ११ असल्यास आवश्यकतेनुसार २० टक्के कोविड रुग्णालये १६ ते २०असल्यास मल्टीस्पेशालिटी व्यवस्थापनाची सोय असलेली सर्व ग्णालये व २० टक्क्यांवर पॉझिटिव्हीटी असल्यास यापूर्वीच्या कॅटेगीरीतील सर्वच रुग्नालये कार्यान्वित करण्याचे निर्देश आहेत.

बॉक्स

१५ दिवसांच्या औषधीचा बफर स्टॉक हवा

जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात सप्टेंबर २०२० मध्ये लागलेली औषधी व साधनसामग्रीची गरज लक्षात घेऊन त्याचे किमान ५०टक्के औषदी नेहमी उपलब्ध राहतील व १५ दिवसांच्या औषधीचा बफर स्टॉक ठेवण्याचे निर्देश प्रशासनाला आहेत. याशिवाय यापूर्वीच्या सर्वेक्षणात नोंद झालेल्या अतिजोखमीच्या व्यक्तींची यादी आरोग्य कर्मचाऱ्यांना देऊन साप्ताहिक तपासणी करण्याचे निर्देश असतांना जिल्ह्यात अश्या प्रकारच्या तपासण्या आता होत नसल्याचे दिसून आले.

पाईंटर

ॲक्टिव्ह रुग्णांची स्थिती

२६ फेब्रुवारी : ४,७३२

२७ फेब्रुवारी : ४,८६६

२८ फेब्रुवारी : ५,४०४

०१ मार्च : ५,७६४

०२ मार्च : ६,०७१

०३ मार्च : ६,५१६

०४ मार्च : ००००

कोट

जिल्ह्यात बेडची संख्या वाढविण्यात आलेली आहे. प्रत्येक तालुक्यातील सेंटर सुरू करण्यात आले व चाचण्यांची संख्या वाढविण्यात आलेली आहे.

- शैलेश नवाल,

जिल्हाधिकारी